bhai jagtap

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या कार्यशैलीविरोधात युवा काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यानी पत्र लिहून प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील मुंबईत तीन दिवस दौऱ्यावर येण्यापूर्वीच या लेटर बॉम्बमुळे मुंबई काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे. 

    मुंबई:  मुंबई काँग्रेसमध्ये नेहमीच गटबाजीचा इतिहास राहिला आहे. पूर्वी देवरा विरुद्ध कामत, निरुपम विरुद्ध देवरा अशी गटबाजी होती. आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या कार्यशैलीविरोधात युवा काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यानी पत्र लिहून प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील मुंबईत तीन दिवस दौऱ्यावर येण्यापूर्वीच या लेटर बॉम्बमुळे मुंबई काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे. आमदार झिशान सिद्दिकी यांनी भाई जगताप यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठीना थेट पत्र लिहून पक्षाचा अध्यक्षच आपल्या विरोधात कारवाया करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

    शिष्टाचाराचा भंग
    मुंबई कॉंग्रेस तर्फे जनतेला टूलकिट वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यातील एक कार्यक्रम वांद्रे येथील बीकेसी पोलीस स्थानकात घेण्यात आला. या कार्यक्रमाला काँग्रेस मंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते पण, वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी यांना बोलवण्यात आले नाही. बीकेसी पोलीस स्थानक हे आमदार सिद्दिकी यांच्या मतदारसंघात येत तिथे काँग्रेसने कार्यक्रम घेऊन स्थानिक आमदाराला बोलवले नाही शिष्टाचाराचा भंग आहे आणि हे सार्वजनिकरित्या खजील करण्यासारखे आहे असे झिशान यांनी पत्रात म्हटले आहे.

    सिद्दिकीला मदत केल्यास पद देणार नाही
    काही महिन्यांपूर्वी मुंबई युवा कॉंग्रेसच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत झिशान सिद्दिकीला मदत केल्यास पक्षात पद देणार नाही असे भाई जगताप यांनी पक्षातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचा गंभीर आरोप झिशान सिद्दीकी यांनी आपल्या पत्रात केला आहे. त्यानी म्हटले आहे की, पक्षात माझ्या विरुद्ध काम करणाऱ्यांना ताकद दिली जाते, अशी तक्रारही झिशान सिद्दिकी यांनी पत्रात केली आहे. हे पत्र आमदार झिशान सिद्दिकी यांनी महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, के, सी, वेणूगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना देखील पाठवले आहे.