मराठा आरक्षणाची वस्तुस्थिती मांडण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील मराठवाडा दौ-यावर ; भाजपाच्या आरक्षणविरोधी नीतीची करणार पोलखोल

मराठा आरक्षणा संदर्भात (Maratha reservation) भारतीय जनता पक्षाकडून (The Bharatiya Janata Party) चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे. भाजपाचा हा खोटारडेपणा उघड करून मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात (the Supreme Court) रद्द होण्यास भाजप व देवेंद्र फडणवीस सरकारच (Devendra Fadnavis government) जबाबदार आहे. ही वस्तुस्थिती समाजाला करून देण्यासाठी SEBC आरक्षणाचे अभ्यासक, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील हे राज्याचा दौरा करत आहेत.

  मुंबई (Mumbai). मराठा आरक्षणा संदर्भात (Maratha reservation) भारतीय जनता पक्षाकडून (The Bharatiya Janata Party) चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे. भाजपाचा हा खोटारडेपणा उघड करून मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात (the Supreme Court) रद्द होण्यास भाजप व देवेंद्र फडणवीस सरकारच (Devendra Fadnavis government) जबाबदार आहे. ही वस्तुस्थिती समाजाला करून देण्यासाठी SEBC आरक्षणाचे अभ्यासक, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील हे राज्याचा दौरा करत आहेत. या दौऱ्याची सुरुवात बुधवारी २ जूनपासून होत असून २ जून ते ५ पर्यंत ते मराठवाड्याचा दौरा करत आहेत.

  सत्य माध्यमातून जनतेसमोर मांडणार
  लाखे पाटील या दौऱ्यात मराठा आरक्षणाची सत्य घटनात्मक कायदेशीर बाजू आणि पेच, काँग्रेसचे नेते, लोकप्रतिनिधी, मराठा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून बैठका घेऊन तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी केंद्रातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या कुटील डावाची पोलखोल संजय लाखे पाटील करणार आहेत.

  चार दिवसांचा दौरा
  डॉ. लाखे पाटील यांच्या मराठवाडा दौ-यात बुधवार, दि. २ जून रोजी सकाळी ११ वाजता नांदेड शहर-ग्रामीण काँग्रेस कमिटी आयोजित बैठक. सायंकाळी ४.३० वाजता अंबेजोगाई, जिल्हा बीड, येथे काँग्रेस कमिटी आयोजित बैठक.
  गुरुवार दि. ३ जून रोजी सकाळी ११ वाजता लातूर ग्रामीण-शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित बैठक, ४.३० वाजता उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी

  आयोजित बैठक
  शुक्रवार ४ जून रोजी सकाळी ११ वाजता बीड येथे आगमन व बीड जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित बैठक. संध्याकाळी ४.३० वाजता जालना येथे आगमन व जालना जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित बैठक. शनिवार दि. ५ जून रोजी सकाळी ११ वाजता औरंगाबाद ग्रामीण-शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित बैठक. असे नियोजन करण्यात आले आहे.