sachin sawant

सचिन सावंत(Sachin Sawant) म्हणाले की, देशात पेगासस सॉफ्टवेअरच्या(Pegasas Software) माध्यमातून फोन टॅपिंग व त्यात मोदी सरकारची(Modi Government) भूमिका हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे.

    मुंबई: पेगासस (Pegasas)कांड महाराष्ट्रात(Maharashtra) ही झाले का? याची चौकशी महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) सरकारने करावी अशी मागणी आहे. महाराष्ट्रात या आधीच फडणवीस(Devendra Fadanvis) सरकारच्या काळातील रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु पेगासस सॉफ्टवेअरच्या वापराच्या बातम्या ही येत होत्या  कोणी IPS अधिकारी मंत्रालयात बसून या विषयावर काम करत होता का? असा सवाल काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत(Sachin Sawant) यानी केला आहे.

    कोणाच्या परवानगीने इस्त्रायलला गेले ?
    सावंत यांनी म्हटले आहे की, माहिती खात्याचे अधिकारी कोणाच्या परवानगीने इस्त्रायलला गेले ? कोणते प्रशिक्षण त्यांनी घेतले ? परत येऊन अहवाल दिला का ? पेगाससशी यांचा संबंध आहे का? निवडणूक काळात प्रचाराचे काम सोडून असे दौरे होणं आश्चर्यकारक व संशयास्पद आहे. किती वेळा कोण अधिकारी इस्त्रायलला गेले? NSO बरोबर शासकीय मिटींग झाल्या होत्या का? NSO शी कोणता पत्रव्यवहार झाला होता का? हे सर्व समोर आले पाहिजे. या अगोदर ही अशा चौकशीची मागणी करण्यात आली होती. दिग्विजयसिंग यानी देखील ही मागणी केली होती.


    फडणवीस सरकारच्या काळात झालेले फोन टॅपिंग
    सचिन सावंत म्हणाले की, देशात पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फोन टॅपिंग व त्यात मोदी सरकारची भूमिका हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. सर्व भाजपा शासित राज्य सरकारांना या कार्यपद्धतीवर काम करण्याचे निर्देश दिले असतील. महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या काळात झालेले फोन टॅपिंग यामागे समान मानसिकता व हेतू आहे.