congress

आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा सूर काँग्रेसकडून पुन्हा एकदा आळवण्यात आला आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन ‘घरवापसी’ करणाऱ्या सुनील देशमुख यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात भाई जगताप आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसने स्वतंत्रपणेच निवडणुका लढवाव्यात, असे मत व्यक्त केले. पक्षाला राज्यात स्वबळावर निवडणूक लढण्याची परवानगी द्यावी. असे झाल्यास 2024 मध्ये काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, व राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री विराजमान होईल असा दावा चव्हाण यांनी यावेळी केला. काँग्रेस सोडून गेलेल्या अनेक नेत्यांना आता पश्चाताप होत आहे असेही ते म्हणाले.

    मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा सूर काँग्रेसकडून पुन्हा एकदा आळवण्यात आला आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन ‘घरवापसी’ करणाऱ्या सुनील देशमुख यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात भाई जगताप आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसने स्वतंत्रपणेच निवडणुका लढवाव्यात, असे मत व्यक्त केले. पक्षाला राज्यात स्वबळावर निवडणूक लढण्याची परवानगी द्यावी. असे झाल्यास 2024 मध्ये काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, व राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री विराजमान होईल असा दावा चव्हाण यांनी यावेळी केला. काँग्रेस सोडून गेलेल्या अनेक नेत्यांना आता पश्चाताप होत आहे असेही ते म्हणाले.

    निर्णय घेण्याची ही वेळ नाही

    तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले कॉंग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेण्याची ही वेळ नसल्याचे सांगत याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ते म्हणाले, निवडणुकीला वेळ असून आताचा हा विषय नाही. गेल्या दीड वर्षापासून सत्तेत असल्याने संघटना बळकट करण्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र सध्याच्या आघाडी सरकारला धक्का लागला तर त्यात सर्वाधिक नुकसान कॉंग्रेस पक्षाचेच हाईल आणि भाजपला त्याचा थेट फायदा होण्याची शक्यता आहे असेही ते म्हणाले. हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. विधानसभा निवडणुकीबाबत सध्या कोणतीही चर्चा नाही.

    मोदी सरकारमुळे देश 20 वर्षे मागे

    कोरोना संकट मोदी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे हाताळल्याने देश 20 वर्षे मागे गेला आहे. सामान्य लोकांचे संसार उघड्यावर आणले. डॉ. मनमोहनसिंह, राहुल गांधी यांनी केलेल्या सूचनांचा विचार न केल्यामुळे देशाला मृत्यूच्या खाईत लोटण्याचे काम केले आहे. मोदी सरकारच्या खोटारडेपणाचा मुकाबला करत महाराष्ट्रासह देशभर काँग्रेस पक्षाला मजबूत करणे हाच राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचा खरा संकल्प ठरेल असे ते म्हणाले

    काँग्रेसमधील मतभेद चव्हाटयावर

    काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, त्यापाठोपाठ माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी स्वबळाच्या निर्णयासाठी पार्टी हायकमांडकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे स्वबळाच्या निर्णयावरून काँग्रेसमधील मतभेद चव्हाटयावर आले आहे. आमदार झिशान सिद्दिकी यांनी भाई जगताप यांच्याविरोधात थेट पार्टी हायकमांडकडे तक्रार केली होती. त्यावरून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप देखील झाले होते.

    हे सुद्धा वाचा