मुंबईकरांवर करवाढीचा बोजा टाकण्याची बाब काँग्रेस खपवून घेणार नाही: भाई जगताप यांचा इशारा

कोविडमध्ये सर्वसामान्य माणूस पिचला आहे. त्यामुळे २०२५ पर्यंत मुंबईकरांवर करवाढीचा बोजा टाकण्याची बाब काँग्रेस खपवून घेणार नाही. ते म्हणाले की रेडी रेकनरनुसार दर वाढवले तर ते परवडणार नाही. त्यामुळे ३०-४० टक्के बोझा सर्वसामान्यांवर पडेल.

    मुंबई: राज्यात महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या कॉंग्रेसकडून सातत्याने शिवसेनेला विरोध करण्याची भुमिका घेतली जात आहे. त्यातच मुंबई महापालिकेत करवाढीचा बोजा टाकण्याची बाब काँग्रेस खपवून घेणार नाही, असे मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटल्याने नवी भर पडली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाई जगताप म्हणाले की, मुंबईतील मालमत्ता कराचा प्रश्न हा गंभीर आहे.

    पाच वर्षे करवाढीचा ठरावही आणू नये

    कोविडमध्ये सर्वसामान्य माणूस पिचला आहे. त्यामुळे २०२५ पर्यंत मुंबईकरांवर करवाढीचा बोजा टाकण्याची बाब काँग्रेस खपवून घेणार नाही. ते म्हणाले की रेडी रेकनरनुसार दर वाढवले तर ते परवडणार नाही. त्यामुळे ३०-४० टक्के बोझा सर्वसामान्यांवर पडेल. महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोणतीही करवाढ करणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, पालिकेने पुढील पाच वर्षे करवाढीचा ठरावही आणू नये, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.