rupali patil

मुंबई : बलात्काराच्या आरोपामुळे आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून होत आहे. तर, महाविकास आघाडीतील नेते धनंजय मुंडें प्रकरणावर सावध भूमिका मांडत आहेत. अशातच मनसे नेत्या रुपाली पाटील या रोख ठोक प्रतिक्रिया देत धनंजय मुंडेच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.

बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेची बहिण करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली आहे. मात्र, यानंतरही धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात अपत्यांची तसंच लग्नाची माहिती लपवल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच आता रुपाली पाटील यांची एक फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे.

पीडितेला न्याय मिळायलाच हवा, अशी भूमिका घेताना ज्यावेळी अत्याचार झाला त्याच वेळी गुन्हा दाखल करायचा होता. आतापर्यंत का शांत बसलात, असा रोखठोक सवाल करत एकप्रकारे धनंजय मुंडे यांची बाजू घेतली आहे.

बलात्कार हा त्या महिलच्या इच्छेविरुद्ध तथा बळजबरीने होत असतो, संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो असेही त्यांनी या पोस्टमध्ये म्हंटले आहे.

बलात्कार झालेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे

राजकारणांनो बलात्कार हे तुमच्या राजकारण खेळी बनवून नका
आणि बायांनो…

Posted by Rupali Patil Thombare on Tuesday, 12 January 2021