Consolation to actor Sahil Khan; Actor Jackie Shroff's wife Ayesha Shroff's fraud complaint canceled

प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयशा श्रॉफ आणि साहिल खान यांनी २००९ साली सायबर सिक्युरिटी कंपनी आणि प्रोडक्शन हाऊसची स्थापना केली होती. ते एक चित्रपटही बनवणार होते. पण तो प्रकल्प गुंडाळला गेला आणि प्रोडक्शन हाऊस बंद झाले. चार कोटी रुपयांची साहिलने फसवणूक केली असून व्यवसायासाठी म्हणून त्याने आपल्याकडून हे पैसे घेतले होते, असा आरोप करत श्रॉफ यांनी वांद्रे येथील पोलीस ठाण्यात फसवणुक आणि धमकी दिली असल्याचे सांगत दोन तक्रारी नोंदवल्या होत्या. त्याविरोधात खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर बुधावारी न्या. एस. एस. शिंदे आणि एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

    मुंबई : बॉलीवूड अभिनेता साहिल खानविरोधात आयशा श्रॉफ यांनी फसवणुक केल्याचा आरोप करत नोंदवलेल्या दोन एफआयआर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्या. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अभिनेता साहिल खानला दिलासा मिळाला आहे.

    प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयशा श्रॉफ आणि साहिल खान यांनी २००९ साली सायबर सिक्युरिटी कंपनी आणि प्रोडक्शन हाऊसची स्थापना केली होती. ते एक चित्रपटही बनवणार होते. पण तो प्रकल्प गुंडाळला गेला आणि प्रोडक्शन हाऊस बंद झाले. चार कोटी रुपयांची साहिलने फसवणूक केली असून व्यवसायासाठी म्हणून त्याने आपल्याकडून हे पैसे घेतले होते, असा आरोप करत श्रॉफ यांनी वांद्रे येथील पोलीस ठाण्यात फसवणुक आणि धमकी दिली असल्याचे सांगत दोन तक्रारी नोंदवल्या होत्या. त्याविरोधात खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर बुधावारी न्या. एस. एस. शिंदे आणि एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

    तेव्हा, साहिल खान आणि आयशा श्रॉफ यांच्यावतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी दोघांमधील वाद सामंजस्याने मिटवण्यात आले असल्याची माहिती खंडपीठाला दिली. तसेच दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत खान यांनी ४ कोटी रुपये थकवले असल्याचे नमूद करण्यात आले असले तरीही आता हे प्रकरण वाढवायचे नसल्याचेही श्रॉफ यांच्याकडून सांगण्यात आले. त्याची दखल घेत सदर प्रकरण व्यावसायिक वादातून निर्माण झाले असल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने साहिल खान यांच्याविरोधात दाखल कऱण्यात आलेल्या दोन्ही तक्रारी रद्द केल्या. मात्र, साहिल खानला १ लाख रुपयांचा दंड ठोठावत सदर रक्कम महाराष्ट्र बाल कल्याण समितीकडे जमा करण्याचे निर्देश दिले.

    साहिल खानने २००१ साली आलेल्या ‘स्टाइल’ सिनेमा काम केले असून उत्तम आणि पिळदार शरीरयष्टीमुळे साहिलला ओळख मिळाली. २०१० साली साहिल खान ‘रामा: द सेवियर’ चित्रपटात तनुश्री दत्ता, द ग्रेट खली यांच्यासोबत झळकला होता. त्यानंतर साहिल खान अचानक स्पॉटलाइटमधून गायब झाला. बॉलिवूड सोडल्यानंतर फिटनेसला प्राधान्य देत त्याने व्यायामाला पूर्णवेळ स्वीकारले आणि गोव्यात ‘मसलस अँड बीच’ नावाची जिम सुरू केली.