अनिल देशमुखांना 11 जून पर्यंत दिलासा; पोलिस दलात नियुक्ती, बदलीत भ्रष्टाचार प्रकरण

पोलिस दलात नियुक्ती आणि बदलीतील भ्रष्टाचार प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या तक्रारीसंबंधातील दस्तावेजांची मागणी सीबीआयने केली होती. या प्रकरणी सीबीआयने 11 जूनपर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याचे मुंबई हायकोर्टात स्पष्ट केले आहे. या प्रकरणावर न्या. एस.एस. शिंदे आणि एन.जे. जमादर यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयद्वारे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील दोन परिच्छेद रद्द करण्यासंदर्भात खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर उद्या 10 जून रोजी सुनावणी होणार आहे.

  मुंबई : पोलिस दलात नियुक्ती आणि बदलीतील भ्रष्टाचार प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या तक्रारीसंबंधातील दस्तावेजांची मागणी सीबीआयने केली होती. या प्रकरणी सीबीआयने 11 जूनपर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याचे मुंबई हायकोर्टात स्पष्ट केले आहे. या प्रकरणावर न्या. एस.एस. शिंदे आणि एन.जे. जमादर यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयद्वारे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील दोन परिच्छेद रद्द करण्यासंदर्भात खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर उद्या 10 जून रोजी सुनावणी होणार आहे.

  दोन्ही याचिकांवर एकाचवेळी सुनावणीची मागणी

  मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी वकील जयश्री पाटील यांनी राज्य सरकार आणि देशमुख यांच्या याचिकांवर एकाचवेळी सुनावणी व्हावी असा युक्तिवाद केला. तथापि, खंडपीठाने देशमुखांच्या याचिकेसह सरकारच्याही याचिकेवर 10 जून रोजीच सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले. सीबीआयतर्फे युक्तिवाद करताना महाधिवक्ता तुषार मेहता यांनी राज्य सरकारद्वारे मागितलेल्या दस्तावेजांसंदर्भात सीबीआय 11 जूनपर्यंत कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले.

  21 एप्रिल रोजी दाखल झाला होता गुन्हा

  21 एप्रिल रोजी सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचार आणि सरकारी पदाचा दुरूपयोग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हा एफआयआर रद्द करावा या मागणीसाठी देशमुखांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

  हे सुद्धा वाचा