पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा, मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर आज Mega Block; पावसाचा अंदाज आणि वेळापत्रक पाहूनच प्रवासाचा मार्ग निश्चित करा

सीएसएमटी मुंबईहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीमी सेवा सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार (Vidyavihar) स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर (Down Fast) वळविण्यात येतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला येथे थांबतील.

  मुंबई : मुंबई विभागात (Mumabi Division) उपनगरीय मार्गावर मध्य आणि हार्बर (Suburban Route Main And Harbour Line) मार्गावर देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी आज मेगाब्लॉक (Today’s MegaBlock) घेण्यात येणार आहे.

  मेन लाईन मार्ग

  सीएसएमटी मुंबई (CSMT Mumbai)-विद्याविहार अप आणि डाऊन स्लो लाईन्स (सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५)

  सीएसएमटी मुंबईहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीमी सेवा सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार (Vidyavihar) स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर (Down Fast) वळविण्यात येतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला येथे थांबतील.

  घाटकोपरहून (Ghatkopar) सकाळी १०.४० ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणारी अप धीमी सेवा विद्याविहार आणि सीएसएमटी मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर (Up Fast) वळवली जाईल, कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबेल.

  हार्बर लाईन मार्ग

  मानखुर्द – नेरुळ अप आणि डाऊन हार्बर लाईन्स (Mankhurd-Nerul Up And Down Harbourline) (सकाळी ११.१५ – ४.१५ दुपारी)

  सीएसएमटी मुंबईहून सकाळी १०.१८ ते दुपारी ३.२८ या वेळेत वाशी/ बेलापूर/ पनवेलसाठी डाऊन हार्बर सेवा आणि सीएसएमटी मुंबईसाठी पनवेल/ बेलापूर/ वाशीहून सकाळी १०.४५ ते ३.४१ या वेळेत अप हार्बर सेवा रद्द राहतील.
  तथापि, ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई – मानखुर्द विभागात विशेष सेवा चालवल्या जातील.

  हार्बर मार्गावरील प्रवाशांना त्यांच्या वैध तिकिटांवर सकाळी १०.०० ते दुपारी ४.३० पर्यंत ट्रान्स हार्बर / मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

  पश्चिम लाईन मार्ग

  वसई रोड – भाईंदर स्थानके अप आणि डाऊन फास्ट लाईन्सवर उद्या मध्यरात्री (११.४५ ते पहाटे – ०३.४५ वाजेपर्यंत)

  वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावर एक जम्बो ब्लॉक (Jumbo Block) घेण्यात येईल. ब्लॉक सोमवार, १३ सप्टेंबर २०२१ आणि मंगळवार, १४ सप्टेंबर २०२१ च्या मध्य रात्री (Midnight) ११.४५ तासांपासून ०३.४५ वाजेपर्यंत आणि डाऊन फास्ट मार्गावर ०:४५ ते ०४.४५ पर्यंत असेल.

  रविवार, १२ सप्टेंबर २०२१ रोजी पश्चिम रेल्वे उपनगरीय विभागात कोणताही ब्लॉक असणार नाही.

  ब्लॉक (MegaBlock) कालावधी दरम्यान, काही अप आणि डाऊन लोकल रद्द केल्या जातील ज्यांचे तपशील उपनगरीय विभागातील स्टेशन मास्तर कार्यालयात उपलब्ध असतील.