Greetings from Deputy Chief Minister Ajit Pawar on the occasion of Krantisurya Mahatma Phule Memorial Day

विनाअनुदानित प्राथमिक,  माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच तुकड्यांच्या तपासणीबाबत शिक्षण विभागाने १ डिसेंबर रोजी आदेश दिलेले आहेत. अनुदानासाठी होणारी दिरंगाई आणि वारंवार होणाऱ्या तपासण्या यामुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत. 

मुंबई :  शिक्षकांना दिलासा देणारा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. अनुदान देताना फेरतपासणीबाबचा आदेश रद्द करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांना २०% व ४०% टप्पा अनुदान देताना पुन्हा फेरमूल्यांकनाची अट राज्य सरकारने घातली होती.  ती रद्द करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी बुधवारी आमदार कपिल पाटील आणि अमरावतीचे आमदार किरण सरनाईक यांना दिले आहे. अशाप्रकारची अट घालण्याचा मंत्री मंडळाचा कोणताही निर्णय नसून त्यामुळे अधिकाऱ्यांनी परस्पर अशाप्रकारची अट घातली किंवा कसे हे तपासून आम्ही रद्द करु असे त्यांनी सांगीतले.

दरम्यान,  विनाअनुदानित प्राथमिक,  माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच तुकड्यांच्या तपासणीबाबत शिक्षण विभागाने १ डिसेंबर रोजी आदेश दिलेले आहेत. अनुदानासाठी होणारी दिरंगाई आणि वारंवार होणाऱ्या तपासण्या यामुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत.

पुन्हा तपासणी ही अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांची चेष्टा आहे. ज्यामुळे हे तपासणीचे आदेश रद्द करून प्रचलित धोरणानुसार अनुदान देण्याबाबत कार्यवाही व्हावी, यासाठी आमदार कपिल पाटील  आणि आमदार विक्रम काळे यांनी मंगळवारीच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली होती.