Construction of Marathi Bhasha Bhavan at Marine Drive and New Maharashtra Bhavan at Navi Mumbai; Deputy Chief Minister Ajit Pawar's announcement

मुंबईत मरिन ड्राईव येथे मराठी भाषा भवनचे बांधकाम करण्यात येणार असून नवी मुंबईत नव्या महाराष्ट्र भवनाची  उभारणी करण्यात येत असल्याची घोषणा वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

  मुंबई : मुंबईत मरिन ड्राईव येथे मराठी भाषा भवनचे बांधकाम करण्यात येणार असून नवी मुंबईत नव्या महाराष्ट्र भवनाची  उभारणी करण्यात येत असल्याची घोषणा वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

  मार्च महिन्यापासून आमदारांचे वेतन पूर्ववत करण्यासोबतच आमदार निधीमध्ये भरीव वाढ करत चार कोटी रूपये निधी देण्याची घोषणाही अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना केली.  इ निविदांबाबत ३ लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाची मर्यादा त्यांनी दहा लाख पर्यंत वाढविण्याची घोषणा देखील केली.

  ठाणे येथे हजार खाटांचे रूग्णालय उभारण्यासाठी ५० कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली. शेतक-यांसह कोणत्याही घटकाला मदत मिळाली नसल्याचे सांगत विरोधककांनी सभात्याग केला.

  आमदार निधीसाठी ३५० कोटीचा वाढीव खर्च

  कोरोनाच्या काळात आमदारांच्या वेतनात तीस टक्के कपात करण्यात आली होती. मात्र आता त्यांना पूर्ण वेतन देण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. या साठी ३५० कोटी रूपये वाढीव खर्च अपेक्षीत असल्याचे वित्तमंत्री म्हणाले. विधानसभेत अर्थसंकल्पीय विभागवार चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितले की, विरोधीपक्षांनी त्यांच्या पध्दतीने या अर्थसंकल्पावर टिका केली आहे. मात्र कोरोनाचे संकट सा-या देशात असल्याने केंवळ राज्यात नाही तर केंद्रातही लॉकडावून सारख्या निर्णयांचा फटका अर्थकारणाला बसला आहे. या मध्ये सामान्य नागरीक मजूर दुकानदार उद्योजक सा-याच घटकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

  शेतक-यांना व्याज माफ

  मागील दहा महिन्यात दहा हजार कंपन्या बंद झाल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली आहे. बँका अडचणीत आहेत तरीही सरकारने शेतक-यांना व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी शेतक-यांना कर्जमुक्ती योजनाआर्थ कारण आडचणीत असतानाही राबविण्यात आली असे ते म्हणाले.  मात्र शेतक-यांना वेळवर कर्जाची फेड करण्याची देखील गरज असल्याचे सांघत ते म्हणाले की त्यासाठी काही अडचणी असतील तर मदत करण्याचा शासनाचा हेतू आहे. वेळेत कर्ज फेड करणा-या शेतक-यांना द्यायच्या प्रतिपूर्तीचा निधी शासनाची स्थिती चांगली झाल्यावर देण्याबाबत हमी देत असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

  प्रशिक्षणार्थीना पाच हजार रूपये

  राज्यातील बेरोजगार तरूणांना कौशल्यविकास प्रशिक्षणार्थी म्हणून ७५ टक्के किंवा पाच हजार रूपये विद्यावेतन देण्याची योजना  सरकारने या वर्षी राबविण्याचे ठरविले आहे. त्या प्रमाणेच निराधार योजना आणि मागासवर्गीयाच्या महामंडळापैकी संत रोहिदास, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, अहिल्या बाई होळकर या महामंडळाना शंभर कोटी रूपयांचा निधी वाढवून देण्याची घोषणा त्यांनी केली. ते म्हणाले की कोरोनाच्या काळात राज कोषीय तूट किंवा अन्य प्रकारची तूट वाढणे स्वाभाविक असल्याने त्यावर चर्चा करणे संयुक्तिक होणार नाही असे अजित पवार म्हणाले.

  इ निविदां मर्यादा १० लाख रूपयांपर्यंत

  वित्तमंत्री अजित पवारयांनी इ निविदांबाबतची ३ लाख रूपयांची मर्यादा १० लाख रूपयांपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. इंधनाच्या दरात केंद्र सरकारने कपात केल्यास दर कमी होतील अशी शुचना करताना लोकसभेत देखील इंधन कराचा समावेश वस्तू आणि सेवा कायद्यात करण्यात यावा अशी सूचना करण्यात आल्याचे ते म्हणाले. पवार म्हणाले की, त्यामुळे राज्यांना देखील या कराचा योग्य तो वाटा मिळण्यास मदत होणार आहे.