electricity

लॉकडाऊनच्या काळात विजेच्या मीटरचे रिडिंग अशक्य असल्याने ग्राहकांना तीन महिन्यांची सरासरी बिले पाठविण्यात आले. प्रत्यक्षातील वीज वापरापेक्षा ही बिले कमी होती. त्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष रिडिंग घेऊन बिले आली तेव्हा अनेकांना धक्का बसला. याविरोधात नागरिकांनी तीन टप्प्यात बिल भरणा आणि एकत्र बिल भरल्यास दोन टक्के सवलत देण्यात आली. मात्र लोकांचा रोष कमी झाला नाही.

मुंबई : वीज कंपन्यांननी लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांना (Consumer) पाठवलेल्या सरासरी वीज बिलामुळे (electricity bills) ग्राहकांना शॉक बसला आहे. वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ऊर्जा विभागाने तयार केलेला प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळला होता. त्यानंतरही आता ऊर्जा विभागाकडून सवलतीबाबत टोलवाटोलवी सुरु आहे. सवलत (electricity concessions) मिळेल या आशेवर राज्यातील लाखो ग्राहकांनी अद्याप वीज बिल भरले नाही. त्यामुळे या रक्कमेत वाढ होत असल्यानेही ग्राहक चिंतेत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात विजेच्या मीटरचे रिडिंग अशक्य असल्याने ग्राहकांना तीन महिन्यांची सरासरी बिले पाठविण्यात आले. प्रत्यक्षातील वीज वापरापेक्षा ही बिले कमी होती. त्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष रिडिंग घेऊन बिले आली तेव्हा अनेकांना धक्का बसला. याविरोधात नागरिकांनी तीन टप्प्यात बिल भरणा आणि एकत्र बिल भरल्यास दोन टक्के सवलत देण्यात आली. मात्र लोकांचा रोष कमी झाला नाही. त्यामुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या आदेशानुसार बिलांमध्ये सवलत देण्यासाठी काही दोन-तीन प्रकारच्या पर्यायांचा प्रस्ताव तयार ऊर्जा विभागाने तयार केला. या सवलतींबाबतचे सुतोवाचही उर्जामंत्र्यांकडून केले जात होते. त्यापोटी येणारी सुमारे दोन हजार कोटींची तूट महावितरणला झेपणारी नसल्याने ती राज्य सरकारच्या तिजोरीतून भरुन काढण्याचा प्रस्ताव होता. मात्र या प्रस्तावावर वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्यातील ग्राहकांचा अपेक्षाभंग झाला आहे.

घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत देण्यासाठी सरकारकडून साडे चार हजार कोटींचे अनुदान मिळावे, असा प्रस्ताव मंत्रीमंडळाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास घरगुती वीज ग्राहकांना दिलासा देता येईल, असे ऊर्जा विभागातील सूत्रांनी सांगितले. तसेच ऊर्जा विभागाने नागरिकांना दिलासा देण्यासाठी नेमलेली समिती सरकारवर आर्थिक बोजा न पडता ऊर्जा कंपन्यांवर हा भार कसा टाकता येईल. याचा अभ्यास करत आहे.