There will be no more autopsy; Home Department Order

महानगर पालिकेच्या के.ई.एम, नायर आणि शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र हे त्या वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत चालवली जातात. उपनगरातील जुहू कूपर रुग्णालय, गोरेगाव सिध्दार्थ रुग्णालय, बोरिवली भगवती रुग्णालय आणि घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र राज्य सरकारच्या जिल्हा पोलिस शल्य चिकित्सक विभागा मार्फत चालवली जातात. त्यामुळे येथील शवविच्छेदन केंद्र २४ तास सुरु ठेवण्याचा अधिकार पोलीस विभागाचा आहे. त्याबाबत पोलीस शल्य चिकित्सक विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने आरोग्य समितीच्या पटलावर मांडली आहे.

    मुंबई : उपनगरातील चार रुग्णालयांत असलेली शवविच्छेदन केंद्र २४ तास सुरु ठेवण्याबाबत महानगरपालिकेने पोलीस शल्य चिकित्सक विभागला पत्र पाठवले आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

    महानगर पालिकेच्या के.ई.एम, नायर आणि शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र हे त्या वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत चालवली जातात. उपनगरातील जुहू कूपर रुग्णालय, गोरेगाव सिध्दार्थ रुग्णालय, बोरिवली भगवती रुग्णालय आणि घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्र राज्य सरकारच्या जिल्हा पोलिस शल्य चिकित्सक विभागा मार्फत चालवली जातात. त्यामुळे येथील शवविच्छेदन केंद्र २४ तास सुरु ठेवण्याचा अधिकार पोलीस विभागाचा आहे. त्याबाबत पोलीस शल्य चिकित्सक विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने आरोग्य समितीच्या पटलावर मांडली आहे.

    अशा मृत्यूमुळे मृतांच्या नातेवाईकांना धक्का बसलेला असतो. त्यात संध्याकाळी ६ नंतर शवविच्छेदन होत नसल्याने दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत वाट पाहावी लागते. अशा प्रसंगी प्रतीक्षा करणे असह्य असते. त्यामुळे उपनगरातील शवविच्छेदन केंद्रही २४ तास सुरु ठेवावे, अशी मागणी पटेल यांनी केली होती. या प्रस्तावावर प्रशासनाकडून ही माहिती सादर करण्यात आली आहे.