यंदा सानुग्रह अनुदान मिळणार का ? मुंबई पालिकेच्या रुग्णालयातील कंत्राटी कर्मचार्‍यांचा सवाल

मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, सायन, टीबी रुग्णालयासह अन्य रुग्णालयांमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी व रोजंदारीवरील कर्मचार्‍यांना पालिकेकडून दिवाळीमध्ये सानुग्रह अनुदान दिले जात नाही. त्यामुळे दरवर्षी त्यांची दिवाळी अंधारातच साजरी होते. मात्र यंदा कोरोना काळामध्ये या कर्मचार्‍यांनी जीवाची पर्वा न करता दिवसरात्र सेवा दिली. त्यामुळे यंदा तरी आम्हाला सानुग्रह अनुदान(bonus) मिळेल का, अशी विचारणा कर्मचार्‍यांकडून केली जात आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, सायन, टीबी रुग्णालयासह अन्य रुग्णालयांमध्ये(bmc hospitals) अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी व रोजंदारीवरील कर्मचार्‍यांना पालिकेकडून दिवाळीमध्ये सानुग्रह अनुदान दिले जात नाही. त्यामुळे दरवर्षी त्यांची दिवाळी अंधारातच साजरी होते. मात्र यंदा कोरोना काळामध्ये या कर्मचार्‍यांनी जीवाची पर्वा न करता दिवसरात्र सेवा दिली. त्यामुळे यंदा तरी आम्हाला सानुग्रह अनुदान(bonus) मिळेल का, अशी विचारणा कर्मचार्‍यांकडून केली जात आहे.

महापालिकेतील कामगार, अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, डॉक्टर, परिचारिका यांना सानुग्रह अनुदान देण्यात येते.
यंदा अर्थसंकल्पामध्ये सानुग्रह अनुदानासाठी १५३ कोटींची तरतूद केली आहे. मात्र शहराला आरोग्य सेवा पुरवण्यात पुढे असलेल्या कंत्राटी कर्मचारी आणि आरोग्य सेविकांना मात्र दरवर्षी सानुग्रह अनुदान दिले जात नाही.

त्यामुळे या कर्मचार्‍यांना अंधारातच आपली दिवाळी साजरी करावी लागते. मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात १५३, नायरमध्ये ९७, सायनमध्ये १५०, शिवडीच्या टीबी रुग्णालयात ५७ आणि कॅन्सर, थॅलेसेमिया यासारख्या आजारांसदर्भातील केंद्रामध्ये काम करणारे ९८ कर्मचारी तसेच चार हजार आरोग्य सेविका आहेत. मात्र या सर्व कर्मचार्‍यांना पालिकेकडून कोणत्याही प्रकारचे सानुग्रह अनुदान दिले जात नाही. कोरोना विषाणूच्या संक्रमणाने मागील अनेक महीने मुंबईकर त्रस्त आहेत, अशा परिस्थितीत महापालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी तसेच विविध खात्यातील कंत्राटी कामगार, रोजंदारी कामगार, एमडेक्स-तंत्रज्ञ व अन्य कर्मचारी, आरोग्य सेविका मुंबईतील नागरिकांना प्रामाणिकपणे नियमित सेवा पुरवत आहेत. त्यामुळे यंदा सानुग्रह अनुदान मिळण्यात यावे, अशी मागणी कर्मचार्‍यांकडून करण्यात येत आहे.

यंदा किमान १५ हजार सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी विनंती कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी, आरोग्यसेविका, स्वच्छ मुंबई अभियानातील कर्मचारी, थॅलेसेमिया, कर्करोग, बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन केंद्रातील कर्मचारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.

कायम कामगारांप्रमाणे रुग्णालयातील रोजंदारी, बहुउद्देशीय, एमडेक्स-तंत्रज्ञ, थॅलेसेमिया केअर, बालरोग, कर्करोग आणि बॉन मेरो ट्रान्सप्लांटेशन केंद्रातील कर्मचारी, आरोग्य खात्यातील कंत्राटी कर्मचारी, आरोग्यसेविका, अंशकालिन कर्मचारी यांना महापालिकेने १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशी विनंती आम्ही मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.

- प्रदीप नारकर, चिटणीस, म्युनिसिपल मजदूर युनियन