ठाण्यात कोविड रुग्णालयातील कोरोना योद्ध्यांची गरज संपल्यावर ठेकेदाराने त्यांना कामावरून केले कमी, दरेकरांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

ठाणे महापालिकेचे बाळकूम येथे कोविड रुग्णालयातील सुमारे ५०० कामगारांना १८ ऑगस्ट २०२१ रोजी कामावरून कमी करण्यात आले. संतप्त झालेल्या कामगारांनी १८ ऑगस्ट रोजी कोविड रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन(Protest By Medical Staff At balkum) सुरू केले होते.

    मुंबई: ठाणे(Thane) महापालिकेच्या बाळकूम येथील कोविड रुग्णालयातील(Balkum Covid Hospital) डॉक्टर्स, नर्स, अन्य वैद्यकीय कर्मचारी(Medical Staff) आदी सुमारे ५०० कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave)येण्याची शक्यता असल्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. त्यामुळे केवळ व्यावसायिक फायद्यासाठी आरोग्य कर्मचारी कमी करण्याचा ओम साई आरोग्य केअर प्रा.लि. या ठेकेदाराचा निर्णय शासकीय सूचनेचा उपमर्द करणारा असून आपण याची गांभीर्याने नोंद घेऊन कोणतेही कर्मचारी कमी न करण्याबाबत संबंधित ठेकेदाराला आदेश द्यावेत, अशी मागणी आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर(Pravin Darekar Wrote A Letter TO Chief Minister) यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

    ठाणे महापालिकेचे बाळकूम येथे कोविड रुग्णालयातील सुमारे ५०० कामगारांना १८ ऑगस्ट २०२१ रोजी कामावरून कमी करण्यात आले. संतप्त झालेल्या कामगारांनी १८ ऑगस्ट रोजी कोविड रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी माहिती मिळताच मी तातडीने या आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली व डॉक्टर व नर्स यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. तसेच यासंदर्भात येथील अधिकाऱ्यांबरोबर तात्काळ संयुक्त बैठक घेणार असून यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले होते, परंतु ते आश्वासन पूर्ण करण्यात आले नसून आपण स्वतः या विषयाकडे गांभीर्याने बघावे, अशी मागणी दरेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

    कोरोना संकट काळात ज्यांनी आपल्या जिवाची बाजी लावली, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठी असतानाही, अतिशय कमी मनुष्यबळात दिवसरात्र काम केले. आज आज त्यांची गरज संपली म्हणून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. आज अचानकपणे ओम साई आरोग्य केअर प्रा.लि. या ठेकेदाराने रुग्णसंख्या कमी असल्याची सबब देऊन सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना २१ ऑगस्ट २०२१ पासून कमी करणार असल्याचे सांगत आहे. त्यामुळे आपण याची गांभीर्याने नोंद घ्यावी व कोणतेही कर्मचारी कमी न करण्याबाबत संबंधित ठेकेदाराला आदेश द्यावेत, अशी मागणी दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.