rohit pawar

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेकांनी केंद्र सरकारला लसींचा पुरवठा करण्याबाबत विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने हा प्रश्न निकाली काढावा असा सल्ला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना दिला आहे.

    मुंबई: महाराष्ट्रासह देशात कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. त्यातच आता कोरोना लसीवरुन जोरदार राजकारण सुरु झाले आहे. केंद्र सरकारकडून कोरोना लसीचा पुरवठा होत नसल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लसीकरण थांबले आहे. या मुद्दायवरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लक्षवेधी ट्विट केले आहे. या ट्विट्च्या माध्यमातून रोहित पवार यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे.

    राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेकांनी केंद्र सरकारला लसींचा पुरवठा करण्याबाबत विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने हा प्रश्न निकाली काढावा असा सल्ला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना दिला आहे.

    कोरोनाबाबत केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसारच सरकार निर्णय घेत असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकून आश्चर्य वाटलं. लसीसंदर्भात राज्यातील विरोधक शांत असले तरी सरकारने वस्तुस्थिती मांडलीय. त्यामुळं राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने हा प्रश्न निकाली काढावा, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

    नाहीतरी सध्या काही राज्यात निवडणूक सुरू असल्याने त्या संपेपर्यंत तिथला कोरोना शांत बसला आहे. त्यामुळं तिथं लसीची तेवढी गरज नाही. तोपर्यंत तरी देशाचा मोठा आर्थिक डोलारा सांभाळत असलेल्या महाराष्ट्राला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन साहेबांनी लसींचा पूर्ण साठा पाठवून द्यावा, अशी विनंती रोहित पवार यांनी आणखी एका ट्विटच्या माध्यमातून केली आहे.