मुंबईत पावसाच्या शिडकाव्याने वातावरणात गारवा,पण रोगराईच्या चिंतेची पसरतेय हवा

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या अवकाळी पावसाने(rain in mumbai) रोगराई वाढण्याची भीती आरोग्य खात्याने व्यक्त केली आहे.

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या अवकाळी पावसाने(rain in mumbai) रोगराई वाढण्याची भीती आरोग्य खात्याने व्यक्त केली आहे. पावसाळ्यात साथीचे रोग(diseases) डोके वर काढतात. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईत अधूनमधून पावसाचा शिडकावा होत आहे. अचानक येणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ होत आहे. पावसाच्या शिडकाव्याने लोकांना चिंब व्हावे लागत आहे. अवकाळी पावसाने मुंबईत कमालीचा गारवाही निर्माण झाला आहे. हे वातावरण आजारपणासाठी पोषक असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाची रिमझिम सुरू आहे. आभाळ काळवंडले आहे. वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. हवामानात निर्माण झालेल्या या बदलामुळे मुंबईकर अस्वस्थ झाला आहे. ताप खोकला आणि सर्दी होण्याचे प्रमाण वाढत असून कोरोनाचा वाढण्याचा धोकाही वाढण्याची दाट शक्यता आरोग्य खात्याने वर्तविली आहे.