राज्यात कोरोनाचे १४ हजार ३१७ नवे रुग्ण, ५७ जणांचा मृत्यू

राज्यात १४,३१७ नवीन रुग्णांची नोंद झाली झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २२,६६,३७४ झाली आहे. राज्यात १,०६,०७० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ५७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, रुग्णांची संख्या ५२,६६७ वर पोहोचली आहे.

    मुंबई (Mumbai). राज्यात १४,३१७ नवीन रुग्णांची नोंद झाली झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २२,६६,३७४ झाली आहे. राज्यात १,०६,०७० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ५७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, रुग्णांची संख्या ५२,६६७ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३२ टक्के एवढा आहे.

    राज्यात आज ५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई 4, कल्याण डोंबिवली मनपा ५, नंदूरबार ३, पुणे ९, जालना ४, परभणी ३, यवतमाळ ५, नागपूर ५ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ५७ मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३ मृत्यू ठाणे ६, चंद्रपूर २, परभणी २, औरंगाबाद १, सातारा १ आणि वर्धा १ असे आहेत.

    आज ७,१९३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २१,०६,४०० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.९४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७२,१३,३१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,६६,३७४ (१३.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,८०,०८३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,७१९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.