राज्यात ९,९२७ नवीन कोरोना रुग्णांची नाेंद

राज्यात मंगळवारी ९,९२७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २२,३८,३९८८ झाली आहे. आज १२,१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण २०,८९,२९४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३४% एवढे झाले आहे.

    मुंबई (Mumbai). राज्यात मंगळवारी ९,९२७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २२,३८,३९८८ झाली आहे. आज १२,१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण २०,८९,२९४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३४% एवढे झाले आहे. राज्यात आज एकूण ९५,३२२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात आज ५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ५६ मृत्यूपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यु हे मागील आठवड्यातील अाहेत. उर्वरित १० मृत्यु हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १० मृत्यु ठाणे-५, पुणे-४ आणि बुलढाणा-१असे आहेत.

    आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७०,२२,३१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,३८,३९८ (१३.१५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,५७,९६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,८२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत १०१२ कोरोना रुग्ण
    दरम्यान मुंबईत दिवसभरात १०१२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ३३५५९५ एवढी झाली आहे. तर आज २ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आता पर्यंत ११५१० मृत्यूची नोंद करण्यात आली.