Chaityabhoomi

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमीवरुन माध्यमांद्वारे थेट प्रसारण करण्यात येत आहे. त्यामुळे अनुयायींना घरुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता येणार आहे. चैत्यभूमीवर प्रमुख नेते, मंत्री आणि कार्यकर्ते उपस्थिती लावणार आहेत.

  • मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल चैत्यभूमीवर दाखल

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar)  यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्तर मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात अनुयायी अभिवादन करायला येत असतात. हजारोंच्या संख्येने अनुयायी येथे उपस्थिती लावतात. परंतु यंदा कोरोनाचा संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी अनुयायांना घरुनच अभिवादन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रशासनाने केलेल्या या आवहानाला अनुयांयांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

Chaityabhoomi

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमीवरुन माध्यमांद्वारे थेट प्रसारण करण्यात येत आहे. त्यामुळे अनुयायींना घरुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता येणार आहे. चैत्यभूमीवर प्रमुख नेते, मंत्री आणि कार्यकर्ते उपस्थिती लावणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारीही उपस्थित झाले आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेही बाबसाहेबाच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. चैत्यभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Chaityabhoomi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने चैत्यभूमीवर हेलकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली गेली. अकाशातूनसुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले आहे. अनेक दिग्गज मान्यवरांनी अभिवादन केले. राज्यपाल, मुख्यमंत्री, आणि उपमुख्यमंत्र्यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले.

Chaityabhoomi

डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

Chaityabhoomi

डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’ अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली.

Chaityabhoomi ajit pawar

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंध, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊया, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

Chaityabhoomi

चैत्यभूमीवर दरवर्षी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या बंधू-भगिनींनाही उपमुख्यमंत्र्यांनी वंदन केले आहे. कोरोना संकटामुळे यंदा या अनेकांनी आपापल्या घरुनंच डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केल्याबद्दल त्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहे.