पावसाळ्यापूर्वी कोरोना संकट संपवायचे आहे : मुख्यमंत्री

मुंबई:“३१ मेपर्यंत देश आणि आपला महाराष्ट्रही लॉकडाऊनमध्ये आहे. मी आलो की लॉकडाउनच जाहीर करतो असं तुम्हाला वाटत असेल. साहजिक आहे, किती काळ लॉकडाउनमध्ये काढणार ? याला काही उत्तर आहे का?

 मुंबई:“३१ मेपर्यंत देश आणि आपला महाराष्ट्रही लॉकडाऊनमध्ये आहे. मी आलो की लॉकडाउनच जाहीर करतो असं तुम्हाला वाटत असेल. साहजिक आहे, किती काळ लॉकडाउनमध्ये काढणार ? याला काही उत्तर आहे का? जगात कुणाकडे करोनाचं उत्तर नाही. लॉकडाऊन उठवायचा तर तो या क्षणीही उठवता येईल पण लॉकडाऊन उठवल्यास काय स्थिती उद्भवेल, याची कल्पना मला आहे. लॉकडाऊन उठवून मला महाराष्ट्राला संकटात ढकलायचे नाही. महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला मी तयार आहे. टीकेचा धनी झालो तरी मी लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घाईघाईत घेणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. करोनाचे संकट आपल्याला पावसाळ्यापूर्वी संपवावं लागणार आहे, असे सांगत शिस्त आणखी कडक हवी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

ग्रीन झोनमध्ये सर्व व्यवहार हळूहळू सुरू होत आहेत. तेथील दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात येणार आहे, असे नमूद करताना रेड झोनमध्ये कोणत्याही स्थितीत लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी यापुढेही व्हायला हवी, असे मुख्यमत्र्यांनी सांगितले.

मुंबई, ठाणे परिसरातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चाकरमानी मूळगावी परतत आहेत. त्यांना मुख्यमत्र्यांनी गावी जाण्याची घाई करू नका अशी विनंती केली. थोडे दिवस वाट पाहा. करोना विषाणू घेऊन तुम्ही गावी जाऊ नका. तुमच्यामुळे तुमच्या तेथील कुटुंबाला संकटात ढकलू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.