children infected with corona

राज्यातील ५१ हजार ९९३ लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. शून्य ते १० वयोगटातील मुलांचे कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण ३.७२ टक्क्यावर गेले आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार राज्यातील ५१ हजार ९९३ लहान मुले-मुली कोरोनाबाधित झाली आहेत.

मुंबई : राज्यात कोरोना फोफावला (Corona crosses danger level) आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. परंतु त्याहुनही धक्कादायक माहिती समोर आली आहे. लहान मुलांमध्ये (children infected with corona ) कोरोनाबाधित होण्याची संख्या वाढली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ लाख ३० हजार ८६१ एवढी झाली आहे. तर त्यातील २ लाख ५८९ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेत ३७ हजार ७५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये कोरोनाबाधित लहान मुलांनी ५० हजारांचा टप्पा पार केला आहे.

राज्यातील ५१ हजार ९९३ लहान मुलांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली आहे. शून्य ते १० वयोगटातील मुलांचे कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण ३.७२ टक्क्यावर गेले आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार राज्यातील ५१ हजार ९९३ लहान मुले-मुली कोरोनाबाधित झाली आहेत. लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले असले तरी त्यांचा मृत्यूदर त्या तुलनेत कमी आहे. त्यामुळी ही दिलासादायक बाब असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. लहान मुलांना कोरोनाची लागण होण्यात त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे सहा वर्षावरील मुलांनी मास्कचा वापर करावा असे तज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे.

२ लाख ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण 

कोरोनाचा धोका ज्येष्ठ नागरिकांन अधिक आहे. कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकांच्या आकड्याने २ लाखांचा टप्पा पार केला आहे. ५१ ते ६० वयोगटातील २ लाख २६ हजार ५८ कोरोना रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक सापडले आहेत. एकूण रुग्णसंख्येमध्ये हे प्रमाण १५.९५ टक्के आहे. ६१ ते ७० या वयोगटातील १ लाख ५० हजार ७४७ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ७१ ते ८० वयोगटातील ७१ हजार १२५ रुग्ण कोरोनाबाधित आहेत.