धारावीमध्ये आज २५ रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला ८३३ वर

मुंबई: धारावीमध्ये आज २५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच एकाचा मृत्यू झाला आहे. या २५ जणांमध्ये प्रेमनगरमधील २४ वर्षीय पुरुष, केळा वखारमधील २८ वर्षीय महिला, राजीव गांधी नगरमधील २९ वर्षीय महिला,

मुंबई: धारावीमध्ये आज २५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच एकाचा मृत्यू झाला आहे. या २५ जणांमध्ये प्रेमनगरमधील २४ वर्षीय पुरुष, केळा वखारमधील २८ वर्षीय महिला, राजीव गांधी नगरमधील २९ वर्षीय महिला, ९० फिट रोड भागातील ६० वर्षीय पुरुष, धोरवाडातील २६ वर्षीय महिला, मुकुंदनगरमधील ५ जण, मुस्लीमनगरमधील ३० वर्षांची महिला, न्यु म्युनिसिपल चाळीतील ४२ वर्षीय पुरुष, सिद्धीविनायक सोसायटीतील ३७ वर्षीय पुरुष , माटुंगा लेबर कॅम्पमधील दोन जण इत्यादींचा समावेश आहे. धारावीतील कोरोना रुग्णांचा आकडा आज ८३३ वर पोहोचला आहे. तर २२२ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.