मुंबईत कोरोनाच्या औषधांचा काळाबाजार, ७ जणांना अटक

  • कोरोनावर उपचार करण्यासाठी ५ हजारांचे रेमडेसेवीर इंजेक्शन ३० ते ४० हजारांना विकत होते. त्यामुळे या काळ्याबाजाराची माहिती अन्न व औषध पुरवठा विभागाला मिळाली. यावर या विभागाने चौकशी केली असता, काळाबाजार करणाऱ्या ७ विक्रेत्यांना अन्न व औषध पुरवठा विभागानं बेड्या ठोकल्या आहे.

 मुंबई – राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी ५ हजारांचे रेमडेसेवीर इंजेक्शन तब्बल ३० ते ४० हजारांना विकले जात  होते. त्यानंतर या काळ्याबाजाराची माहिती अन्न व औषध पुरवठा विभागाला मिळाली. यावर या विभागाने चौकशी केली असता, काळाबाजार करणाऱ्या ७ विक्रेत्यांना अन्न व औषध पुरवठा विभागानं बेड्या ठोकल्या आहेत. 

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. परंतु कोरोनावर उपचार करण्यासाठी उपाय म्हणून असलेले इंजेक्शन अव्वाच्या सव्वा भावाने विकलं जात होतं. त्यामुळे एफडीएने पोलिसांच्या गुन्हे शाखा ७ ला ही माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मदतीसह एफडीएने एकूण ७ जणांना अटक केली आहे. 

परंतु या काळ्याबाजारात अजून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त सुनील भारद्वाज यांनी व्यक्त केली आहे.