leather industry of dharavi

सुरुवातीला नोटबंदी (demonetization), त्यानंतर जीएसटी (GST), आर्थिक मंदी आणि कोरोनाची(Corona) पहिली लाट. चामड्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना(Leather Industry) गेल्या पाच वर्षांत एकामागे एक संकटांना तोंड द्यावं लागत आहे.

  मुंबई: धारावीमध्ये(Dharavi) तब्बल २० हजारांहून अधिक लघु व मध्यम उद्योग आहेत. इथली लेदर इंडस्ट्री (leather industry) म्हणजेच चामड्याचा व्यवसाय खूप प्रसिद्ध आहे. बॅग, जॅकेट, बूट, बॉक्सेस अशा चामड्याच्या कित्येक वस्तू याठिकाणी बनवल्या जातात. या वस्तूंना परदेशातही चांगली मागणी आहे. मात्र कोरोनाचा फटका या व्यवसायाला बसला आहे.

  सुरुवातीला नोटबंदी (demonetization), त्यानंतर जीएसटी (GST), आर्थिक मंदी आणि कोरोनाची(Corona) पहिली लाट. चामड्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना(Leather Industry) गेल्या पाच वर्षांत एकामागे एक संकटांना तोंड द्यावं लागत आहे.

  मुंबईत दुसर्‍या लाटेमुळे लॉकडाऊन (lockdown) लागण्याआधीच अनेक लेदर उत्पादक (manufacturers) आणि मजूर त्यांच्या गावी परतले. जे इथेच राहिले त्यांन‍ा दोन वेळेचं जेवण मिळवण्यास अडचणी येत आहेत. शिवाय हाताला काम नसूनही घरभाडे आणि इतर बिलं भरण्याकरता संघर्ष करावा लागत आहे. सध्या मुंबईतील ७० टक्के कारखाने बंद आहेत. त्यामुळे बरेच कामगार परत येण्याच्या मनस्थितीत नाहीत. परिणामी अनेक कारखाने कामगारां अभावी कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता आहे.

  काही प्रमाणात निर्बंधांसह कारखाने चालू ठेवण्याची सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी असूनही कॅनव्हास, रनर्स, फिटिंग्ज यासारखा कच्चा माल (raw materials) मिळणं आणि ऑर्डर्स मिळणं अवघड होत आहे. त्याहून मोठा प्रश्न आहे तो कामगारांचा. त्यामुळे तर ऑर्डर मिळाली तरीही ती पूर्ण करणं शक्य होत नाही.
  बरेच लेदर उत्पादक या महामारीत व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी ऑनलाईन पर्याय निवडत आहेत. मात्र सध्या लागू असलेल्या निर्बंधांमुळे यातही अडचणी येत आहेत. जे आधीपासून वस्तूंची ऑनलाईन विक्री करत आहेत, ते म्हणतात सध्या जेवढ्या ऑर्डर मिळताहेत त्यातून पुरेसा नफा मिळत नाही.

  लेदर कामगार आता राज्य सरकारकडून मदत मिळण्याची अपेक्षा करत आहेत किंवा वीज बिल आणि जागा भाड्यातून सूट मिळावी अशी त्यांची आशा आहे.