एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर दुसरीकडे अशोकरावांचे आंदोलन, हे बरोबर आहे का?; संभाजीराजे आक्रमक

द्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात तसेच महागाई विरोधात काँग्रेस तर्फे आज नांदेडमध्ये मोठं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं. या सर्व घटनेवरून छत्रपती संभाजीराजे हे काँग्रेस नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आक्रमक झाले. ‘एकीकडे कोरोनाचा उद्रेक असताना दुसरीकडे अशोक चव्हाण यांचं आंदोलन आणि त्यात ते म्हणतात की विराट मोर्चा झाला, हे बरोबर आहे का?’, असा प्रश्न छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करून उपस्थित केला आहे.

    मुंबई : केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात तसेच महागाई विरोधात काँग्रेस तर्फे आज नांदेडमध्ये मोठं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं.

    दरम्यान या सर्व घटनेवरून छत्रपती संभाजीराजे हे काँग्रेस नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आक्रमक झाले. ‘एकीकडे कोरोनाचा उद्रेक असताना दुसरीकडे अशोक चव्हाण यांचं आंदोलन आणि त्यात ते म्हणतात की विराट मोर्चा झाला, हे बरोबर आहे का?’, असा प्रश्न छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करून उपस्थित केला आहे.

    या आंदोलनावेळी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचं अशोक चव्हाण यांनी आभार मानले हे कितपत योग्य आहे?, असं छत्रपती संभाजीराजे यांनी विचारलं आहे. केंद्र सरकार विरोधी झालेल्या आंदोलनामध्ये अशोक चव्हाण हे बैलगाडीवर स्वार होऊन या आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकार विरोधी झालेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने कोरोनाचं संकट असताना देखील अशा प्रकारे आंदोलन करणं कितपत योग्य आहे?, असा प्रश्न उपस्थित करत छत्रपती संभाजी राजे यांनी अशोक चव्हाणांसह राज्य सरकारवरही ताशेरे ओढले आहेत.