कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार! नेमकी काय स्थिती आहे महाराष्ट्रात?

राज्यात बुधवारी १५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,१४,८९,०८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,०६,३४५ (१२.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,४६,२९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबई : राज्यात बुधवारी ५,१३२ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने ७२४ रुग्णांची वाढ झाल्याचे समोर आले. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,०६,३४५ झाली आहे. काल ८,१९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर राज्यात आजपर्यंत एकूण ६२,०९,३६४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९३ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५८,०६९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात बुधवारी १५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,१४,८९,०८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,०६,३४५ (१२.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,४६,२९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत बुधवारी दिवसभरात २८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३९७२२ एवढी झाली आहे. तर ५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५९३० मृत्यूची नोंद करण्यात आली.