काळजी घ्याच, नगर-नाशिक सीमेवर कोरोना वाढला, अजूनही डेल्टा व्हायरस आहेच, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले स्पष्ट

राज्यात सुमारे ७० जणांना पहिला डोस दिला गेला आहे, आणि आगामी काळात लसीकरण अधिक वेगाने हील असेही त्यांनी सांगितले. नगर-नाशिकच्या सीमेवर अजूनही काही भागात कोरोनाचा प्रभाव दिसून येतो आहे, तिथे काळजी घेण्याची गरज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. ते जालना येथून नाशिककडे जात असताना येवला येथे प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

    मुंबई- राज्यातील निरंबध हटविण्यात आले सले, तरी अद्यापही कोरोनाचा धोका संपलेला नाही, डेल्टा व्हायरस आजही अस्तित्वात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ज्या भागात लसीकरण झाले आहे, त्या भागाला कोरोनाचा धोका फारसा नाही, मात्र ज्या भागात जूनही लसीकरम झालेले नाही, त्या ठिकाणी काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या भीतीने आता घाबरायची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

    राज्यात सुमारे ७० जणांना पहिला डोस दिला गेला आहे, आणि आगामी काळात लसीकरण अधिक वेगाने हील असेही त्यांनी सांगितले. नगर-नाशिकच्या सीमेवर अजूनही काही भागात कोरोनाचा प्रभाव दिसून येतो आहे, तिथे काळजी घेण्याची गरज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. ते जालना येथून नाशिककडे जात असताना येवला येथे प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

    नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव असून येवल्यात रुग्ण वाढत असल्याचे विचारले असता….नक्कीच येवला तालुक्या लगत नगर जिल्हा असल्याने निश्चितच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो कारण की येवल्याचे लोक कोपरगावला जातात कोपरगावचे येवला येथे येतात त्यामुळे निश्चित त्याचा परिणाम होऊ शकतो. कोरोनाने आपले स्वरूप अजूनही बदललेला नसून डेल्टा वायरसच आहे. त्यामुळे अजून काळजी करण्याचे कारण नसले तरीदेखील लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.