मुलुंड ठरतेय कोरोनाचे हॉटस्पॉट – सापडले ५२ रूग्ण

मुंबई : धारावी, वरळी हे परिसर हॉटस्पॉट ठरले असताना आता मुलुंड पश्चिमेकडील झोपडपट्टी परिसर असलेला रामगड, इंदिरा नगर आणि अमर नगर या वस्तींमध्ये तब्बल ४५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर

 मुंबई :  धारावी, वरळी हे परिसर हॉटस्पॉट ठरले असताना आता मुलुंड पश्चिमेकडील झोपडपट्टी परिसर असलेला रामगड, इंदिरा नगर आणि अमर नगर या वस्तींमध्ये तब्बल ४५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर अन्य भागातून ७ रुग्ण सापडल्याने मुलुंडमधून एकाच दिवशी तब्बल ५२ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुलुंडमध्ये खळबळ उडाली आहे.

मुलुंडमधील रामगड, इंदिरा नगर आणि अमर नगर या झोपडपट्टी असलेल्या परिसरात काही दिवासांपूर्वी कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. त्यामुळे पालिकेच्या टी वार्डकडून हा परिसर सील करत येथील नागरिकांची दोन दिवसांपूर्वी तपासणी करण्यात आली. त्यावेळी ज्यांना लक्षणे दिसत होती अशा ५३ व्यक्तींचे स्वाब यावेळी घेतले. या ५३ व्यक्तींपैकी ४५ जणांचा अहवाल रविवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. तर मुलुंडच्या अन्य भागातून करण्यात आलेल्या सर्व्हेतून ७ जण कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. ५२ कोरोनाबाधितांना मिठागार मनपा शाळेतील क्वारंटाईन सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. तसेच या परिसरात आता अधिक लोकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती टी वार्ड विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी दिली.