Corona infection in half cabinet of Thackeray government; Will Sharad Pawar be quarantined?

ठाकरे सरकारच्या अर्ध्या मंत्रीमंडळाला कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादी काँगेसचे बडे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाचा संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे रविवारी नाशिक मधील एका लग्न सोहळ्याला भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील हजेरी लावली होती. भुजबळांचा रोपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर आता शरद पवार क्वारंटाईन होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    मुंबई: ठाकरे सरकारच्या अर्ध्या मंत्रीमंडळाला कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादी काँगेसचे बडे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाचा संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे रविवारी नाशिक मधील एका लग्न सोहळ्याला भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील हजेरी लावली होती. भुजबळांचा रोपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर आता शरद पवार क्वारंटाईन होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    महाविकास आघाडी सरकारमधील ३३ कॅबिनेट मंत्र्यांपैकी आतापर्यंत १७ जणांना कोरानाची लागण झालीय. तर १० राज्यमंत्र्यांपैकी ६ जणांना कोरोना होऊन गेला आहे. त्यामुळे एकूण ४३ पैकी २३ मंत्री कोरोनाबाधित आहेत. त्यातील काही पूर्ण बरे झालेत, तर काहींचा बरं होण्याचा संघर्ष सुरू आहे. म्हणजेच सुमारे ५६ टक्के मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

    आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्नपुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ खडसे आणि आता छगन भुजबळांना कोरोनाची लागण झाली आहे.  शरद पवार हे सर्व नेत्यांच्या सातत्याने संपर्कात होते.

    राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा रविवारी नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला शरद पवार यांच्याबरोबर भुजबळ यांनी हजेरी लावली होती. लग्न सोहळा पार पडून २४ तासही उलटत नाहीयत, तोपर्यंतच भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी लग्नसोहळ्याला उपस्थित होते. आता छगन भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सगळ्यांचीच धाकधुक वाढली आहे.