बेस्टच्या आणखी २ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

मुंबई : बेस्टच्या ओपरेशन अँड मेंटेनन्स पुरवठा शाखेच्या सिस्टम प्रोटेक्शन डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असलेल्या एका ५० वर्षीय कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाले. त्यांना टिळक नगर रेल्वे स्टेशन

 मुंबई : बेस्टच्या ओपरेशन अँड मेंटेनन्स  पुरवठा शाखेच्या सिस्टम प्रोटेक्शन डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असलेल्या एका ५० वर्षीय कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाले. त्यांना टिळक नगर रेल्वे स्टेशन जवळील एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे. त्यांना मूत्रपिंडाची पूर्वीची समस्या आहे. असे अहवालात समोर आले आहे.

सदर बेस्ट कर्मचारी रजेवर असताना परदेश दौरा केला होता. २० मार्च रोजी म्हणजेच शुक्रवार आणि २१ मार्च रोजी शनिवारी (हाफ डे) ड्युटी जॉइन केली होती. तेव्हापासून त्याचा विभाग बंद करण्यात आल्याची माहिती मिळते. २३ मार्च  पासून त्यांना ताप आहे, सर्व प्रायव्हेट क्लिनिक बंद असल्याने त्यांनी स्वत: ची औषधे घेतली होती तरीही त्यांची प्रकृती सुधारत नव्हती म्हणून २६ मार्च  रोजी उपरोक्त रुग्णालयात दाखल करण्यात आले. १ एप्रिल रोजी त्यांची कोविड चाचणी  तेव्हा ती पॉझिटिव्ह आली.

पालिका अधिकाऱ्यांनी २ एप्रिल पासून त्याच्या संपूर्ण निवासी इमारतीला सील केले आहे.  ही सर्व  माहिती प्राप्त झाल्यानंतर, बेस्ट अधिका ऱ्यांनी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पुढील आदेश होईपर्यंत क्वारंटाईन केले आहे. अशीही माहिती मिळते.

दरम्यान, मीरा रोड येथे राहणारे बेस्टच्या गोरेगाव आगारात वाहक असलेले एक कर्मचारीही १० एप्रिल पासून मिरारोड मधील रुग्णालयात दाखल आहेत. तेही कोरोना बाधित आहेत. त्यांचा बीसी क्रमांक ९४२९९ असे असल्याचे समजते.

या संदर्भात बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांना विचारले असता, आता बेस्ट कर्मचाऱ्यांचीही काळजी घ्यायला हवी. आवश्यक सेवा ते देत आहेत. त्यांना सर्व सोयी सुविधा दिल्या पाहिजे. आता बेस्टने पैसे नाही म्हणून हात झटकू नये.