कोरोना फसवतोय आणि माणसं हार मानत आहेत; मुंबईत मृत्यूचे प्रमाण वाढले, रुग्णसंख्येत घट, दुपटीच्या कालावधीतही वाढ

रुग्णदुपटीच्या परिस्थितीत लॉकडाऊननंतर  कमालीचा फरक पडलेला दिसत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच्या कालावधीत वाढ झाली आहे. या पंधरवड्यात मुंबईचा कोरोना दुपटीचा कालावधी १५ दिवसांनी वाढला आहे. ८ एप्रिल रोजी रुग्णदुपटीचा कालावधी ३३ दिवसांपर्यंत खाली आला होता.

  मुंबई : राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत दररोज कोरोना रुगणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत असून ही आता चिंतेची बाब ठरत आहे.  रुगणांची संख्या कमी कमी होत आहे. रोजच्या रुग्णसंख्येत घट तसेच दुपटीच्या कालावधीतही वाढ होत असल्याची बाब काहीशी दिलासादायक आहे.

  तसेच रुग्णदुपटीचा कालावधीही वाढत आहे. मुंबईसह राज्यभरासाठी ही समाधानाची  बाब असली तरी हा लॉकडाऊनचा परिणाम आहे की, खरोखरच कोरोनाची लाट ओसरत आहे, असा संभ्रम निर्माण होत आहे.

  रुग्णदुपटीच्या परिस्थितीत लॉकडाऊननंतर  कमालीचा फरक पडलेला दिसत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच्या कालावधीत वाढ झाली आहे. या पंधरवड्यात मुंबईचा कोरोना दुपटीचा कालावधी १५ दिवसांनी वाढला आहे. ८ एप्रिल रोजी रुग्णदुपटीचा कालावधी ३३ दिवसांपर्यंत खाली आला होता. मात्र २५ एप्रिलला तो ५८ दिवसांपर्यंत येऊन ठेपला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास आरोग्य यंत्रणांवरील भार कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

  गेल्या काही दिवसांत मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने खाली येताना दिसत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत दिवसाला १० हजार नवे कोरोना रुग्ण आढळत होते. ४ एप्रिलला ही संख्या ११,१६३ वर गेली होती. मात्र गेल्या १५ दिवसांत यामध्ये टप्प्याटप्प्याने घट होत ही संख्या आता साडेपाच हजारापर्यंत खाली आलीआहे.

  राज्यभरात मात्र जोर कायम

  राज्यभरात मात्र कोरोनाचा जोर कायम आहे.  राज्यभरात १८ एप्रिल रोजी ६८,६३१ रुग्ण आढळले होते. मात्र लॉकडाऊननंतरही त्यात विशेष असा फरक पडलेला नाही. आजही राज्यभरात ६६ हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहे. विशेष म्हणजे राज्यभरात सरकारी नियमांचे चांगले पालन केले जात आहे.  मात्र मुंबईसह राज्यभरात आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात हे प्रमाण काही संख्येत असले तरी मुंबईत ते काही हजारांच्या संख्येत आहे. मुंबईत रविवारी ५,५४२ रुग्ण आढळले, तर बरे होणाऱ्यांची संख्या ८,७४८ म्हणजे सुमारे ३ हजारांनी अधिक आहे.  मात्र मृतांची संख्या दररोज ७० ने वाढत असल्याने चिंताही वाढत आहे.

  लाट ओसरतेय की…?

  गेल्या काही दिवसांत आढळणाऱ्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोरोनाची लाट ओसरतेय असे अनेकांना वाटत आहे. त्याचवेळी ‘ब्रेक द चेन’अंतर्गंत अनेक निर्बंध असल्यामुळे लाट ओसरली असल्याचे अनेकांना वाटत आहे. हा निर्बंधांचा परिणाम असल्यामुळे अजूनही काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.