महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढतोय, शहरांतील काही भागांत लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूसह कडक निर्बंध ; अनेक जिल्ह्यांत रूग्णांच्या संख्येत वाढ

मुंबईत सुद्दा कोरोनाने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. तर पनवेलमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जर हिच परिस्थिती पुढच्या काही दिवसांत अधिक प्रमाणात उद्भवली तर संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होतोना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तर कुठे नाईट कर्फ्यूसह कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. विदर्भात कोरोनाने थैमान घातलं असून नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक आणि औरंगाबादसह परभणीत देखील दोन दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे.

  मुंबईत सुद्दा कोरोनाने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. तर पनवेलमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जर हिच परिस्थिती पुढच्या काही दिवसांत अधिक प्रमाणात उद्भवली तर संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  पाहा कोणत्या शहरांत आहे लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू आणि कडक निर्बंध :

  नागपुरात लॉकडाऊन

  नागपुराच कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरमध्ये येत्या १५ मार्चपासून ते २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात असणार आहे.

  परभणीत दोन दिवसांचा लॉकडाऊन

  परभणी जिल्ह्यात २ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. आज रात्री १२ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.

  पुण्यात कडक निर्बंध

  वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहे. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

  पनवेलमध्ये नाईट कर्फ्यू

  कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १२ ते २२ मार्च या कालावधीत पनवेलमध्ये रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे.