भिवंडीत एका वृद्धाचा कोरोनाने मृत्यू; तर कोरोना बाधितांची संख्या २१ वर

भिवंडी  : भिवंडी शहर परिसरात कोरोना आजाराचा फौलाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरु असताना रुग्णाची संख्या दिवसोंदिवस वाढत असून आज पर्यंत २१ रुग्ण बाधित असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे.

 भिवंडी  : भिवंडी शहर परिसरात कोरोना आजाराचा फौलाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरु असताना रुग्णाची संख्या दिवसोंदिवस वाढत असून आज पर्यंत २१ रुग्ण बाधित असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान  शहरातील कणेरी परिसरात राहणाऱ्या एका ६२ वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारादरम्यान  रुग्णालयात मृत्यू झाला आहे. सदर पॉझिटिव्ह रुग्ण हे डायबिटीस आणि प्लुरल इफुजन या रोगाने बाधित होता . त्यांना भिवंडीतील आई जी एम हॉस्पिटल मध्ये  दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना जे जे हॉस्पिटल मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. येथूनही त्यांना जीटी हॉस्पिटल मुंबई येथे हलविण्यात आले होते. मात्र या ठिकाणी उपचार सुरु असतांना त्यांचा ३० एप्रिल रोजी मृत्यू झाला  याबाबत भिवंडी मनपास मेल द्वारे माहिती मिळाली पालिका आयुक्तांनाही ते मयत झाल्याची माहिती दिली दरम्यान शहरात  एकूण २५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक रुग्णाचा मृत्यू झाला असून, ३ कोरोना रुग्ण हे बरे  झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला. 

यावेळी महापालिका आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर , तहसीलदार शशिकांत गायकवाड,  इंदिरा गांधी रुग्णालय अधिष्ठाता डॉ. अनिल थोरात, महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.जयवंत धुळे, शांतीनगर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक ममता डिसुझा.यानी कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांचे  गुलाब पुष्प व त्यांचेवर पुष्वृष्टी करण्यात आली, तर  २१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत अशी माहिती मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली आहे. तर ग्रामीण भागात सुद्दा कोरोना ग्रस्त बाधितांची संख्या वाढली असून आज पर्यंत १७ रुग्ण उपचार घेत आहेत त्यामुळे कोरोना रुग्णाची शहरी व ग्रामीण परिसरातील संख्या ३८  असून कोरोना केंद्रात २९४ रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आले आहे