महाराष्ट्र राज्यात कोरोनाने डॉक्टरांचा मृत्यू, आयएमएची माहिती

दिल्ली पहिल्या क्रमांकावर असून येथे १०९ डॉक्टरांचा मृत्यू ज़ाला आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर बिहार असून इथे ९६ डॉक्टरांचे निधन ज़ाले. तिसऱ्या क्रमांकावर उत्तरप्रदेश असून ७९ डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर राजस्थान मध्ये ४३, आंध्रप्रदेश ३४, झारखंड ३९, तेलंगणा ३२, गुजरात ३१, पश्चिम बंगाल ३०, महाराष्ट्रात २३ मृत्यूंची नोंद केली आहे. उर्वरित राज्यांमधील डॉक्टरांच्या मृत्यूची संख्या २३ हुन जास्त आहे.

  मुंबई: पहिल्या लाटेप्रमाणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कर्तव्य बजावत असताना डॉक्टरांना आपला जीव गमवण्याच्या घटना घडत आहेत. मागील महिन्याभरात राज्यात २३ तर देशात ६२४ डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे अशी माहिती
  आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशन कडून देण्यात आली.

  कोरोना सुरु झाल्यापासून सतत असणारी ड्युटी , आरोग्याकडे दुर्लक्ष, अपुऱ्या सोयीसुविधा आदी कारणाने डॉक्टरांचा मृत्यु होत असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

  राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाने बळी गेलेल्या डॉक्टरांची संख्या १२ होती. मात्र १ जून पर्यंत ही संख्या २३ वर गेल्याने दुप्पट झाली असल्याचे संघटनेकडून सांगण्यात येत आहे.

  दरम्यान, आयएमए संघटना मागील काही महिन्यापासुन डॉक्टरांना मिळणाऱ्या सोयिसुविधा तसेच इतर प्रश्नाबाबत झगडत आहे. शिवाय कोरोना योद्या असलेल्या मृत डॉक्टरांना विमा रक्कम देण्यात यावी अशी मागणीही केली जात आहे, पण याकडेही दुर्लक्ष केले जात आहे.

  राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कोणतीही यंत्रणा डॉक्टरांच्या मृत्यूची नोंदच ठेवत नसल्याची बाब आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी या पूर्वीच सांगितली होती, या पार्श्वभूमीवर कोरोनाने मृत्यू झालेल्या डॉक्टरांची नोंद ठेवण्यात यावी असे पुन्हा सांगण्यात आले असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

  देशात कोरोनाने ६२४ डॉक्टरांचा बळी-