कोरोनामुळे एकाच शहरात पुढच्या मॅचेस होण्याची शक्यता?; २ हजार कोटींचे नुकसान टाळण्याचा BCCI चा प्रयत्न

अहमदाबादच्या नरेंदंर मोदी स्टेडियमवर आयपेलच्या १२ मॅचेस होणार होत्या. त्यातील आत्तापर्यंत केवळ सहा मॅचेस पार पडल्या आहेत. यापुढील ६ आणि ८ मेच्य् मॅचेस अहमदाबादमध्ये होतील का, याबाबात साशंकता आहे.

  मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि वाढणारी रुग्णसंख्या पाहतास इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या उर्वरित मॅचेस मुंबईत होण्याची शक्यता आहे. मुंबईत यासाठी सर्व तयारी करण्यात येत असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. सोमवारी केकेआरचे दोन प्लेरस् वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने, आरसीबी विरुद्ध केकेआरची मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

  या आठवड्याच्या शेवटी मुंबईत होणार शिफ्टिंग

  सर्व मॅचेस या आठवड्याच्या शेवटीस मुंबईत शिफ्ट करण्यात येण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की यापुढे बंगुळुरुसह इतर कोणत्याही ठिकाणी यापुढे मॅचेस होणार नाहीत. प्लेऑफसह फायनल मॅचही मुंबईतच होण्याची शक्यता आहे. तूर्तास या बाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही, मात्र लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा बीसीसीआयकडून होण्याची शक्यता आहे.

  मुंबईच्या ३ स्टेडियम्सवर होणार पुढच्या मॅचेस

  ८ आणि ९ मे नंतर आयपेलच्या सर्व मॅचेस या मुंबईतीली तीन स्टेडियम्सवर होण्याची शक्यता आहे. वानखेडे, ब्रेबॉन आणि नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर पुढच्या मॅचेस खेळल्या जातील. वानखेडेवर आत्तापर्यंत या सीझनच्या १० मॅचेस पार पडल्या आहेत. इतर दोन स्टेडियमही मॅचेससाठी तयारी असल्याची माहिती आहे.

  नरेंद्र मोदी स्टेडियमला मोठा धक्का

  अहमदाबादच्या नरेंदंर मोदी स्टेडियमवर आयपेलच्या १२ मॅचेस होणार होत्या. त्यातील आत्तापर्यंत केवळ सहा मॅचेस पार पडल्या आहेत. यापुढील ६ आणि ८ मेच्य् मॅचेस अहमदाबादमध्ये होतील का, याबाबात साशंकता आहे. मुंबईत सर्व मॅचेस खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला, तर प्ले ऑफ आणि फायनल मॅचेसना नरेंद्र मोदी स्टेडियमला मुकावे लागणार आहे.

  वेळापत्रकातही बदलाची शक्यता

  या वीकेंडंला जर सर्व मॅचेस मुंबईत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला, तर शेड्यूलमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. एकाच दिवसांत दोन –दोन मॅचेस खेळवल्या जाण्याची शक्यता आहे. आत्ताही हे करण्यात येतेच आहे, मात्र आता अशा दिवसांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आयपीएलची फायनल मॅचही ३० मे ऐवजी जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. जर आयपीएलचे वेळापत्रक जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गेले तर इंग्लंडमध्ये १८ ते २२ जून दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल मॅचची तारीकखही बदलली जाण्याची शक्यता आहे. सध्या इंग्लंडमध्ये जाण्या येण्यास बंदी आहे. अशा स्थितीत प्लेअर्सना जरी सूट मिळाली तरी त्यांना तिथे जाऊन १४ दिवस क्वारंटीन व्हावे लागणार आहे, या सगळ्याचा एकत्रित परिणाम वेळापत्रकावर होणार आहे.