राज्यात आज ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ,दिवसभरात ७९० रुग्णांची नोंद झाल्याने आकडा १२ हजार पार

मुंबई :राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम असून, आज एका दिवसात तब्बल ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.आतापर्यंतचा मृतांचा हा सर्वाधिक आकडा आहे. राज्यातील मृत्यूंची

 मुंबई  :राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम असून, आज एका दिवसात तब्बल ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा मृतांचा हा सर्वाधिक आकडा आहे. राज्यातील मृत्यूंची संख्या ५२१ झाली आहे. राज्यात आज ७९० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तसेच आतापर्यंत २००० जण बरे होऊन घरी गेले आहेत.

राज्यात मृत्यू झालेल्या ३६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी मुंबईमध्ये सर्वाधिक २७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाबधिता रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने मुंबईसाठी ही बाब चिंताजनक ठरत आहे. मुंबई खालोखाल पुणे ३, अमरावती २, तर वसई विरार १, अमरावती जिल्ह्यामधील १ तर औरंगाबाद मनपामधील १ मृत्यू आहे. या शिवाय पश्चिम बंगालमधील एकाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. 
 
मृतांमध्ये २८ पुरुष तर ८ महिला आहेत. त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील १९ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर एक जण ४० वर्षांखालील आहे. यापैकी ३ जणांची इतर आजाराबद्दलची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३३ रुग्णांपैकी २३ जणांमध्ये ( ७० %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आज १२१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २,००० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,६१,०९२ नमुन्यांपैकी १,४८,२४८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १२,२९६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ८४४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १०,५१३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ४४.४० लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात १,७४,९३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२,६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.