कोरोना रुग्णवाढीचा आकडा स्थिर; राज्यात ५१,८८० नवीन रुग्णांची नोंद

मंगळवारी राज्यात ५१,८८० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४८,२२,९०२ झाली आहे. आज ६५,९३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ४१,०७,०९२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.१६% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ६,४१,९१० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    मुंबई : मंगळवारी राज्यात ५१,८८० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४८,२२,९०२ झाली आहे. आज ६५,९३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ४१,०७,०९२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.१६% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ६,४१,९१० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    राज्यात आज ८९१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ८९१ मृत्यूंपैकी ३९७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २३६ मृत्यू, नागपूर-५९, ठाणे-३०, नाशिक-२९, जळगाव-२०, नंदूरबार-१८, पुणे-१७, चंद्रपूर-१२, औरंगाबाद-८, भंडारा-८, गडचिरोली-५, ज़ालना-४, गोंदिया-३, नांदेड-३, सोलापूर-३, वाशिम-३, अहमदनगर-२, सांगली-२, यवतमाळ-२, हिंगोली-१, कोल्हापूर-१, लातूर-१, पालघर-१, परभणी-१, रायगड-१, रत्नागिरी-१ आणि सातारा-१ असे आहेत.

    सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८१,०५,३८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४८,२२,९०२ (१७.१६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,३६,३२३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०,३५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    दरम्यान, मुंबईत दिवसभरात २५५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ६६११७५ एवढी झाली आहे. तर ६२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १३४३४ मृत्यूची नोंद करण्यात आली.