मुंबईत कोरोनाचे १००२ नवे रुग्ण, ३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई:मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये किंचित घट झाली असली तरी ३९ जणांचा बळी गेला आहे. आजमुंबईमध्ये 1002 नवे रुग्ण सापडल्याने

 मुंबई: मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये किंचित घट झाली असली तरी ३९ जणांचा बळी गेला आहे. आज मुंबईमध्ये 1002 नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ३२ हजार ७९१ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १०६५ वर पोहोचला आहे.  मृत्यू झालेल्या ३९९ जणांमधील २५ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २८ पुरुष तर ११ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील चार जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. तर १२ जण हे ६० वर्षांवरील, तर २३ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. मुंबईत कोरोनाचे ८६६ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या २६  हजार ८२२ वर पोहोचली आहे. तसेच ४१० रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ८८१४ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.