शरद पवारांच्या २ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची बाधा

शरग पवारांच्या ताफ्यातील हे दोन्ही सुरक्षा रक्षक रॅपिड टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे सिल्व्हर ओकवरील सर्व सुरक्षा रक्षक, कर्मचारी आणि शरद पवारांच्या पीएंचीही कोरोना चाचणी केली आहे. त्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचे समजते आहे. लवकरच त्यांचे अहवाल येतील.

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबई निवासस्थान सिल्व्हर ओक या बंगल्यावरील दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच कोरोनाबाधित असलेले दोन्ही सुरक्षा रक्षक शरद पवारांच्या ताफ्यातील असल्याचे समजते आहे. 

शरद पवारांच्या ताफ्यातील हे दोन्ही सुरक्षा रक्षक रॅपिड टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे सिल्व्हर ओकवरील सर्व सुरक्षा रक्षक, कर्मचारी आणि शरद पवारांच्या पीएंचीही कोरोना चाचणी केली आहे. त्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचे समजते आहे. लवकरच त्यांचे प्राप्त होतील. 

ताफ्यातील दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याने शरद पवार होम क्वारंटाईन होतील किंवा पुढील काही दिवस कोणालाही भेटणार नाहीत. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरक्षा रक्षकांना कराड दौऱ्यानंतर कोरोनाची लागण झाल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. मंत्री बाळासाहेब पाटील पण कराड दौऱ्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.