राज्यात काेराेना रुग्णसंख्या चढ-उतार; ४,१७४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात बुधवारी ४,१७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,९७,८७२ झाली आहे. काल ४,१५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,०८,४९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ४७,८८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    मुंबई : राज्यात बुधवारी ४,१७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,९७,८७२ झाली आहे. काल ४,१५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,०८,४९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ४७,८८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    राज्यात बुधवारी ६५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,५३,३८,७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,९७,८७२ (११.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. ध्या राज्यात ३,०७,९१३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ५३२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४७६०५ एवढी झाली आहे. तर ४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १६००४ मृत्यूची नोंद करण्यात आली.