कोरोना रुग्ण संख्या कमी झाली; राज्यात ७,२४३ नवीन रुग्णाांची नोंद

मंगळवारी राज्यात ७,२४३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,७२,६४५ झाली आहे. काल १०,९७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५९,३८,७३४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२१ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,०४,४०६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    मुंबई : मंगळवारी राज्यात ७,२४३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,७२,६४५ झाली आहे. काल १०,९७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५९,३८,७३४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२१ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,०४,४०६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात मंगळवारी १९६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. नोंद झालेल्या एकूण १९६ मृत्यूंपैकी १६७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.

    सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४३,८३,११३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,७२,६४५ (१३.९१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७४,४६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६०७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ४५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७२८६४४ एवढी झाली आहे. तर ८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५६४४ मृत्यूची नोंद करण्यात आली.