कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.१२% एवढे झाले; राज्यात २६,६७२ नवीन रुग्णांची नोंद

रविवारी राज्यात २६,६७२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५५,७९,८९७ झाली आहे. तर काल २९,१७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५१,४०,२७२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.१२% एवढे झाले आहे. राज्यात एकूण ३,४८,३९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    मुंबई : रविवारी राज्यात २६,६७२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५५,७९,८९७ झाली आहे. तर काल २९,१७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५१,४०,२७२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.१२% एवढे झाले आहे. राज्यात एकूण ३,४८,३९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान, राज्यात काल ५९४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ५९४ मृत्यूंपैकी ३९८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ७२६ ने वाढली आहे.

    सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३०,१३,५१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,७९,८९७ (१६.९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६,९६,३०६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २१,७७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात १,४२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ६,९६,९१० एवढी झाली आहे. तर ४९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १४,५६५ मृत्यूची नोंद करण्यात आली.