चिंताजनक बातमी – मुंबईत काेराेना रुग्णसंख्येसह प्रतिबंधित इमारतींची वाढली संख्या,१२ दिवसांमध्ये दुपटीने वाढ

मुंबईतील(Mumbai) कोरोना रुग्णांची(Corona patients) संख्या वाढल्याने प्रतिबंधित इमारती आणि मजल्यांची संख्याही वाढते आहे. २ दिवसांपूर्वी मुंबईत २४ इमारती(24 Buildings sealed In Mumbai) प्रतिबंधित होत्या. रुग्णसंख्या वाढल्याने सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभीच ही संख्या दुपटीने म्हणजे ५० वर पोहचली आहे.

  मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील(Mumbai) कोरोना रुग्णांची(Corona patients) संख्या वाढल्याने प्रतिबंधित इमारती आणि मजल्यांची संख्याही वाढते आहे. २ दिवसांपूर्वी मुंबईत २४ इमारती(24 Buildings sealed In Mumbai) प्रतिबंधित होत्या. रुग्णसंख्या वाढल्याने सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभीच ही संख्या दुपटीने म्हणजे ५० वर पोहचली आहे. तर विविध ठिकाणच्या इमारतींमधील साडेबाराशेहून अधिक मजले प्रतिबंधित करण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांसह प्रतिबंधित क्षेत्रांची संख्याही वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

  कोरोना नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने निर्बंधात शिथिलता दिली आहे. मात्र कोरोनाचे नियम न पाळता सार्वजिनक ठिकाणी गर्दी वाढत असल्याने आटोक्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे. सणासुदीचे दिवस जवळ आल्यामुळे खरेदीसाठीही गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे गेल्या दहा-बारा दिवसांपासून मुंबईतील दैनंदिन रुग्णांची संख्याही दुपटीने वाढली आहे. ऑगस्टमध्ये सव्वा दोनशेपर्यंत खाली आलेली रोजची रुग्णांची संख्या आता सव्वा दोनशेच्या पुढे गेली आहे. प्रतिबंधित क्षेत्राची संख्या झिरोवर आली होती. मात्र रुग्ण वाढल्याने प्रतिबंधित इमारती व मजल्यांची संख्याही वाढते आहे. पाचपेक्षा जास्त रुग्ण इमारतीत सापडल्यास ती इमारत १४ दिवसांसाठी प्रतिबंधित करण्याचा नियम असून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत. तसेच पाचपेक्षा कमी रुग्ण असल्यास केवळ रुग्ण राहत असलेला मजला प्रतिबंधित करण्याचा नियम आहे. त्यानुसार सर्व विभाग कार्यालयांमध्ये सध्या याबाबतची अंमलबजावणी सुरू आहे. मागील १० ते १२ दिवसांत प्रतिबंधित इमारतींची संख्या दुप्पट झाली असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

  या भागात वाढतेय रुग्णसंख्या
  मागील काही दिवसांत लालबाग, परळ, भायखळा, दादर-माहीम, कुलाबा, वांद्रे-खार पश्चिम, वडाळा, नायगाव या भागांत रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचे आढळले आहे.

  प्रतिबंधित इमारती –

  • वांद्रे, खार, सांताक्रूझ पश्चिम (एच पश्चिम)- ११
  • अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले (के पश्चिम)- ९
  • चेंबूर (एम पश्चिम)- ६
  • मलबार हिल, ग्रॅण्ट रोड (डी)- ६

  प्रतिबंधित इमारतींचे मजले –
  कांदिवली (आर दक्षिण) -७३

  अंधेरी, विलेपार्ले पश्चिम(के पश्चिम)- ११६
  दादर, माहीम, धारावी(जी उत्तर)- १०२
  मालाड (पी उत्तर)- ९९
  बोरिवली (आर मध्य)- ९७
  मुलंड (टी)- ९३