मुंबईत कडक निर्बंधांमुळे नव्हे तर चाचण्या कमी झाल्याने घटली रुग्णसंख्या, दिलासा देण्यासाठी दिखावा ?

मुंबईत ५० हजाराहून अधिक चाचण्या(corona tests in mumbai) केल्या जात असताना ७ ते ९ हजार रुग्ण आढळून येत होते. मात्र २५ एप्रिलला २८ हजार चाचण्या केल्याने ३८६२ इतकेच रुग्ण समोर आले आहे.

  मुंबई: मुंबईत गेल्या दोन महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रसार(corona spread) वाढल्याने रुग्णसंख्या वाढली आहे. मात्र काल रुग्णसंख्या(corona patients in mumbai) कमी झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले होते. महापालिकेने कोरोना रुग्ण शोधण्यासाठी चाचण्या कमी केल्याने रुग्ण संख्येचा आकडा कमी झाल्याचे समोर आले आहे.

  मुंबईत ५० हजाराहून अधिक चाचण्या केल्या जात असताना ७ ते ९ हजार रुग्ण आढळून येत होते. मात्र २५ एप्रिलला २८ हजार चाचण्या केल्याने ३८६२ इतकेच रुग्ण समोर आले आहे.

  मुंबईमध्ये गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरु आहे. फेब्रुवारीपासून गेल्या दोन महिन्यात हा प्रसार पुन्हा वाढला. मुंबईमधील कोरोना रुग्णांचा आकडा ७ ते ११ हजारावर गेला होता. जास्तीत जास्त चाचण्या करून त्यामधून रुग्ण समोर आल्याने त्यांच्यावर वेळीच उपचार करून कोरोनाचा प्रसार रोखता येऊ शकते असे पालिका प्रशासनाचे म्हणणे होते.

  त्यानुसार पालिका रोज ४० ते ५० हजारावर कोरोना चाचण्या करत होती. मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्याने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या कडक निर्बंधांमुळे रुग्णसंख्या कमी होत आहे असे सांगितले जात आहे. मात्र वस्तुस्थिती पाहता पालिका चाचण्या कमी करत असल्याने रुग्णसंख्या कमी असल्याचे दिसून येत आहे.

  मुंबईमध्ये महापालिकेने ६ एप्रिलला ५१३१९ चाचण्या केल्याने ९२३१ रुग्ण आढळून आले होते. ८ एप्रिलला ५५७४१ चाचण्या केल्याने ८१७४ रुग्ण आढळू आले होते. १० एप्रिलला ५२१५९ चाचण्या केल्याने ८७४४ रुग्ण आढळून आले होते. १३ एप्रिलला ५६२२६ चाचण्या केल्याने ७३०२, १५ एप्रिलला ५०५३३ हजार चाचण्या केल्याने ७७९०, तर २१ एप्रिलला ४६८७४ चाचण्या केल्याने ७१५१ रुग्ण आढळून आले होते.

  यानंतर मात्र पालिकेने चाचण्या कमी करण्यास सुरुवात केली आहे. २२ एप्रिलला ४१८२६ चाचण्या करण्यात आल्या यामुळे ६८४६ रुग्ण आढळून आले. २३ एप्रिलला ३९५८४ चाचण्या करण्यात आल्याने ६७२२ रुग्ण आढळून आले. २४ एप्रिलला ४०२९८ चाचण्या करण्यात आल्याने ५३६२ रुग्ण आढळून आले आहे. तर २५ एप्रिलला २८३२८ चाचण्या करण्यात आल्याने ३८७६ रुग्ण आढळून आले आहेत.