मुंबईकरांनो डोळे सांभाळा, शहराला म्युकोरमायकोसिसचा विळखा ! एका रुग्णाला अंधत्व

या आजाराच्या विळक्यात कोरोना संक्रमित आणि कोरोनातून बरे झालेले, असे दोन्ही प्रकारचे रुग्ण अडकत आहेत. दरम्यान, पालिका रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाला या आजारामुळे अंधत्व आल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. तर काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नीता परब

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी दिल्लीच्या पाठोपाठ आता मुंबईतील कोरोना रुग्णदेखील म्युकोरमायकोसिस या घातक आजाराच्या विळख्यात सापडत आहेत. या आजारामुळे डोळ्यांना फंगल इंफेक्शन होत असल्याचे उघड झाले आहे. या इन्फेक्शनमुळे अंधत्व येण्याचीही शक्यता असून हे इंफेक्शन मेंदूतही पसरत असल्याचे ड़ॉक्टरांचे म्हणणे आहे.

कोरोनातून बऱ्या झालेल्या आणि कोरोनाने संक्रमित असणाऱ्या असे दोन्ही रुग्ण या आजाराच्या विळख्यात सापडत आहेत. कोरोनाव्यतिरिक्त मधुमेह असणारे रुग्णदेखील याच्या विळख्यात सापडत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्यात ५ ते ७ रुग्ण याच्यावर उपचार घेण्यासाठी दाखल होत आहेत. या आजारामुळे २० टक्के रुग्णांच्या डोळ्यांवर परिणाम होत आहे. बहुतांश रुग्ण उपचारासाठी उशिरा येतात. त्यामुळे काहीवेळी हा आजार रुग्णाच्या जीवावर बेतण्याचीही शक्यता असते.

डॉ. नीलम साठे, कान-नाक-घसा तज्ज्ञ, केईएम रुग्णालय.

या आजाराच्या विळक्यात कोरोना संक्रमित आणि कोरोनातून बरे झालेले, असे दोन्ही प्रकारचे रुग्ण अडकत आहेत. दरम्यान, पालिका रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाला या आजारामुळे अंधत्व आल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. तर काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिल्ली, अहमदाबादनंतर मुंबईमध्ये या म्युकोरमायकोसिस या घातक फंगल संक्रमण असलेल्या आजारानं रुग्णांना घेरलंय. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या आजाराच्या विळख्यात कोरोना रुग्ण सापडत आहेत. ज्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा रुग्णांना या आजाराची लागण होत आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून म्युकोरमायकोसिसने ग्रस्त असलेले पाच ते सहा रुग्ण दाखल होत आहेत.