चिंता वाढवणारी बातमी – मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीला कालावधी १,५११ दिवसांपर्यंत घसरला, पालिका प्रशासनासमोर नवे आव्हान

मुंबईतील(Mumbai) कोरोनाची रुग्णसंख्या(Corona Patients) गेल्या १० ते १२ दिवसांपासून वाढली आहे. रोजच्या रुग्णांची संख्या सव्वा दोनशेवरून पावणे चारशेवर पोहचली आहे.

    मुंबई : आटोक्यात आलेली मुंबईतील(Mumbai) कोरोनाची रुग्णसंख्या(Corona Patients) गेल्या १० ते १२ दिवसांपासून वाढली आहे. रोजच्या रुग्णांची संख्या सव्वा दोनशेवरून पावणे चारशेवर पोहचली आहे. कालपर्यंत रुग्ण दुपटीचा कालावधी(Corona Patients Doubling Rate) १,५११ दिवसांपर्यंत घसरला आहे. १० दिवसांपूर्वी हा कालावधी २०५२ दिवसांवर होता. रुग्णांची संख्याही जवळपास दुपटीने वाढली आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी वाढणारी आकडेवारी चिंताजनक आहे.

    रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्य सरकारने निर्बंधात शिथीलता दिली आहे. तसेच सणासुदीच्या खरेदीसाठीही गर्दी वाढली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क व सोशल डिस्टनसिंगचा नियम अनेकांककडून धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मागील दहा – बारा दिवसांत रुग्णांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. दहा दिवसांपूर्वी सव्वा दोनशेपर्यंत घसरलेली रुग्णसंख्या ३९५ पर्यंत पोहचली आहे. २० ऑगस्टला २८५३ सक्रीय रुग्ण होते. आता ही संख्या वाढून ३१०६ वर गेली आहे. तर २०५२ दिवसांवर असलेला रुग्ण दुपटीचा कालावधी १,६११ पर्यंत घसरला आहे. दहा दिवसांपूर्वी रुग्ण वाढीचा दर ०.०३ टक्क्यांपर्यंत खाली गेला होता. आता रुग्णवाढीचा दर ०.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

    तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. रविवारी दिवसभरात ४४ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण बाधित आढळण्याचे प्रमाण ०.७८ टक्के आहे. मुंबईत सध्या एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. मात्र प्रतिबंधित इमारतींची संख्या हळूहळू वाढत असून सध्या ३० इमारती प्रतिबंधित आहेत. कोरोनाचा नवीन प्रकार इतर शहरात वेगाने पसरत असल्याने पालिका सतर्क झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग आदी कोविडचे नियमा पाळा असे आवाहन पालिकेने कले आहे.