corona in dharavi

आशियातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या धारावी(Dharavi Slum Area) झोपडपट्टीत कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईत पालिकेला(BMC Successful In Stopping Corona) यश आले आहे. रोज दोन अंकी आढळणारी रुग्णसंख्या आता एक अंकावर आली आहे.

    मुंबई: मुंबईत कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave)आटोक्यात आली आहे. यात धारावीत(Dharavi) रोज २ ते ४ अशा रुग्णांची नोंद होत आहेत. आज मंगळवारी ३ रुग्ण आढळले.आशियातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या धारावी(Dharavi Slum Area) झोपडपट्टीत कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईत पालिकेला(BMC Successful In Stopping Corona) यश आले आहे. रोज दोन अंकी आढळणारी रुग्णसंख्या आता एक अंकावर आली आहे.

    फेब्रुवारीच्या मध्यानंतर कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले. रोजची रुग्णसंख्या ८ ते ११ हजारावर पोहचली. यावेळी धारावीतही रुग्णांची संख्या वाढली. एक अंकी व नंतर झिरोवर नोंद झालेली धारावीतील रोजची रुग्ण ७० ते ८० वर पोहोचली.

    धारावीसारख्या विस्तीर्ण व दाटीवाटीच्या झोपडपट्टीत रुग्णसंख्या वाढल्याने पालिकेसमोर आव्हान उभे राहिले होते. मात्र वाढवण्यात आलेल्या चाचण्या, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा वेगाने शोध, नियमांची कडक अंमलबजावणी, शिबिरे, जनजागृती आदींमुळे येथील कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. धारावीत आज ३ रुग्ण आढळले. आतापर्यंत रुग्णांची संख्या ७००८ वर पोहोचली आहे. त्यामुळे येथे सध्या ३० सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.