मुंबईत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणामध्ये झाली घट, आकडा ७० वरून आला ३६ वर

मुंबईत(Mumbai) मागील दोन - तीन दिवसांपासून मृत्यूचे(Corona Deaths) प्रमाणही घटत आहे. रोज ५० ते ७० च्यावर कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३४ ते ३७ वर आल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    मुंबई: मुंबईत(Mumbai) कोरोना रुग्णांची(Corona Patients) संख्या घटत असताना मागील दोन – तीन दिवसांपासून मृत्यूचे(Corona Deaths) प्रमाणही घटत आहे. रोज ५० ते ७० च्यावर कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३४ ते ३७ वर आल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यानंतर झपाट्याने वाढलेली रुग्ण संख्या आता घटत आहे. रोज ८ ते ११ हजारावर पोहचलेली रुग्णसंख्या आता एक हजार ते १२०० वर आली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या हजार ते तेराशेपर्यंत स्थिर राहिली आहे. रुग्णसंख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण मात्र कमी होत नव्हते.

    रोज ५० ते ७० च्या वर कोरोनाने मृत्यू होत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आव्हान होते. मात्र मागील दोन – तीन दिवसांपासून रोज मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घटले आहे. २५ मे रोजी ३७ मृत्यू तर रुग्णसंख्या १०३७ होती. २६ मे रोजी ३४ जणांचा मृत्यू व रुग्णांची संख्या १३६२ वर तर २७ मेला ३६ मृत्यू तर रुग्णसंख्या १२६६ इतकी नोंद झाली आहे. मुंबईतील रुग्णसंख्येसह मृत्यूची आकडेवारीही कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे.