शिवडीच्या टीबी रुग्णालयातील एक कर्मचारी कोरोनाबाधित

मुंबई : शिवडीच्या टीबी रुग्णालयात एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईत राहत असलेला हा सफाई कर्मचारी शिवडीच्या टीबी रुग्णालयात काम करतो.

 मुंबई :  शिवडीच्या टीबी रुग्णालयात एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईत राहत असलेला हा सफाई कर्मचारी शिवडीच्या टीबी रुग्णालयात काम करतो. रुग्णालयात वॉर्डमध्ये स्वच्छता करत असताना त्याला ताप जाणवू लागला. त्यामुळे त्याला तातडीने केईएम रुग्णालयात पाठविण्यात आले.त्याच्या स्वाबची चाचणी घेण्यात आल्यानंतर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला कोरोनाची बाधा झाली झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हा कर्मचारी कोणाच्या संपर्कात आलेला आहे, याची माहिती घेण्यात येत आहे. यापुर्वी  शिवडीच्या टीबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेला रुग्ण कोरोना बाधित असल्याचे समोर आले. परळच्या केईएम रुग्णालयात उपचारदरम्यान कोरोना संसर्गाने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे टीबी रुग्णालयात त्या रुग्णाला तपासणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी अशा ६ जणांना खबरदारीचा उपाय म्हणून ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.